सोयगाव ३ जि.प. गट व ६ पं.स. गणासाठी ६५ नामनिर्देशन अर्ज; आज छाननी

सोयगाव ३ जि.प. गट व ६ पं.स. गणासाठी ६५ नामनिर्देशन अर्ज; आज छाननी

 

 

सोयगाव | प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदचे तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी एकूण ६५ उमेदवारांनी अर्ज सादर केले. या अर्जांची छाननी आज गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता होणार असून दि. ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत तालुक्यातील ८५ हजारांहून अधिक महिला-पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात छोटा तालुका असलेल्या सोयगावमध्ये जिल्हा परिषदेचे आमखेडा, गोंदेगाव व फर्दापुर असे तीन गट आहेत. तर पंचायत समितीचे निबायती, आमखेडा, बनोटी, गोंदेगाव, फर्दापुर व सावळदबारा हे सहा गण आहेत. विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी बुधवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

जिल्हा परिषद गटवार अर्जदार :

आमखेडा गट – पुष्पाबाई काळे, मोनाली पवार (राठोड), उर्मिला इगळे.

फर्दापुर गट – सपना राठोड, प्रभावती राठोड, मोहिन इद्रीस मुलतानी, नोसीन सलीमखाँ मुलतानी, सीमा चव्हाण, देवकाबाई राठोड, उमा चव्हाण.

गोंदेगाव गट – पूजा वाघ, सुनिता चव्हाण, शमीना तडवी, सविता बागुल, मनीषा गायकवाड, संगीता नवाळे.

पंचायत समिती गणवार अर्जदार :

आमखेडा गण – जयक्षी पवार, मंगलाबाई निकम, सुरेखा तायडे, सविता मोरे, शुशिलाबाई इगळे.

निबायती गण – दशरथ झरवार, बंद्री राठोड, सविता गव्हाडे, छायाबाई पाटील, हरिभाऊ पाटील, नाना साबळे, संगीता पाटील, ज्योती गव्हाडे.

सावळदबारा गण – प्रदीप गबरु चव्हाण, राधेश्याम जाधव, दारासिंग राठोड, सुनील माकोडे, गणेश राठोड, आनंद जाधव, जयप्रकाश चव्हाण, विलास दरबार राठोड.

फर्दापुर गण – शेख मुन्सी, उत्तम चव्हाण, मकसुद मुलतानी, राहुल राठोड, प्रमोद खोडपे, भारती काकराज.

गोंदेगाव गण – गयाबाई घोडे, सुनिताबाई गावडे, मीराबाई साबळे, मनीषा गायकवाड, रेणुका मवाळे.

बनोटी गण – काजल पाटील, रजना पाटील, वैभवी पाटील, नसरिम शेख, स्वाती बोरसे, कल्पना बोरसे, कल्पना जाधव. (या गणासाठी उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले.)

निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून आज सकाळी ११ वाजता छाननी होणार असून, सर्व उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश शिनगारे व सहाय्यक निवडणूक अधिकारी मनीषा मेणे-जोगदंड यांनी केले आहे.