पाचोरा कन्या विद्यालयात चाचा नेहरूंना आदरांजली

पाचोरा कन्या विद्यालयात चाचा नेहरूंना आदरांजली

पाचोरा – येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मीठाबाई) कन्या विद्यालयात आज दिनांक 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

या निमित्ताने विद्यालयाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे व प्राचार्य संजय पवार यांनी पंडित जवाहर नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी बंधू-भगिनींनी चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी कलाशिक्षक निवृत्ती बाविस्कर यांनी चाचा नेहरूंच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय पंडित नेहरू यांच्या जीवनचरित्रातील बालकांविषयीच्या आठवणी सांगितल्या. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा संगीता राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.

या कार्यक्रमाला पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रा. प्रतिभा परदेशी, प्रा. अंकिता देशमुख,प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, श्री अंबालाल पवार, श्री हेमराज पाटील, श्री विजय पाटील, सौ. कल्पना पाटील, वरिष्ठ लिपिक श्री शिवाजी बागुल, आबाजी पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर, हिरालाल परदेशी, शकील खाटीक आदी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.