महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड

महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या
जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड

पाचोरा- महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील प्रा. शिवाजी शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या 12 व्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी शिवाजी शिंदे यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन त्यांचा सन्मान केला.

अध्यापन क्षेत्रात सुमारे 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्री शिवाजी शिंदे हे पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात सेवेत आहेत. उत्कृष्ट पत्रकार , कवी, निवेदक व संघटक म्हणून ते परिचित आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या निवडीचे जिल्हाध्यक्ष नारायण दादा महाजन व सचिव प्रवीण मोरे सर यांनी स्वागत केले आहे.

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी शिंदे यांना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या या निवड प्रसंगी शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, प्रदेश महासचिव राम यडते, प्रदेश सचिव गोपीनाथ सगर, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ शिवाजी पाटील, मुख्य संघटक राजेंद्र वर्ताळकर, प्रदेश कायदे सल्लागार ऍड गजानन कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.