बेवारस प्रेताच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टीम

बेवारस प्रेताच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टीम

सु-लक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मराठवाडा व खांदेशात मदतकार्य

एक अनोळखी पुरुष वय अंदांजे ४० वर्षीय राहणार माहित नाही यांना वरणगाव जवळ रोड अपघातात दि.२७/१०/२०२२ रोजी मार लागल्याने वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ कळस्कर यांनी दाखल केले. त्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी शासकीय महाविद्यालय जळगाव दाखल केले होते,त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने पोलीसांच्या मदतीने जळगाव येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अति दक्षता विभागामध्ये उपचार चालू होते. औषधे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रामानंद पोलीस स्टेशन जळगाव पोलिसांनी नातेवाईक यांचा शोध घेतला पन कोन्हिच नातेवाईक सापडत नसल्याने रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख व पोलीस नाईक चंद्रकांत पाटील यांनी माणुसकी समूहाचे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना कॉल करून सदर घटनेची माहिती सांगितली. त्या इसमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी माणुसकी समूहाची टीम ने जबाबदारी स्वीकारली व दिनांक ३१/१०/२०२२ वार सोमवार रोजी नेरी नाका परिसरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांना माणुसकी समूहाच्या टीमने सहकार्य केले.अंत्यविधीसाठी रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख,राजू नाईक,दशरथ पवार,पिंटू राठोड समाजसेवक सुमित पंडित,गजानन क्षीरसागर व माणुसकी समुहातील सभासदांनी मदतकार्य केले.