शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार- अमोल शिंदे यांची माहिती

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार- अमोल शिंदे यांची माहिती

———————————————————
मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना तात्काळ नुकसानग्रस्त शेती पिकाचे पंचनामे करण्याचे दिले आदेश

पाचोरा- :
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात रविवार दि.२६/११/२०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री पर्यंत भडगाव तालुक्यात ३५ mm व पाचोरा तालुक्यात २६ mm पाऊस झाला असून यामध्ये शेतकऱ्यांचे कापूस, तूर, मका,ज्वारी, फळपीक, भाजीपाला पिक उभे असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील (कापूस,तूर इ.) पिकांचा विमा उतरवलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन पद्धतीने किंवा स्थानिक तालुका कृषि कार्यालयात जाऊन नुकसानीची तक्रार नोंदवावी जेणेकरून पिक विमा कंपनी मार्फत पिकांचे पंचनामे करण्यात येतील.
तसेच ज्या शेतकऱ्यांचा विमा नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत.अशी माहिती भाजपाचे पाचोरा-भडगाव निवडणुक प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.