श्री .गो .से हायस्कूल पाचोरा येथे हर घर तिरंगा या अभियानांतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित श्री.गो.से हायस्कूल पाचोरा येथे नुकतीच पाचोरा नगरपरिषद व शासनाने 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरात राबविण्यात निर्देशित केलेले आहे या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रीय ध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे यामुळे प्रत्येक घरात कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वज फडकवला जाईल देशभक्तीचे वातावरण निर्माण होईल या अभियानाला यशस्वी करण्यासाठी आमच्या विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा राबविण्यात आली. देशभक्ती, स्वातंत्र्य दिन इ. विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. *चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक- सनी राजेंद्र अहिरे इयत्ता सातवी क द्वितीय- यज्ञेश दिलीप पाटील,सहावी ड. तृतीया -किरण भिकन बडगुजर पाचवी ड. *रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक- धनश्री विजय पाटील व ग्रुप नववी क, द्वितीय- धनश्री रवींद्र पाटील आठवी क- रेणुका चौधरी व ग्रुप आठवी क असा निकाल घोषित करण्यात आला शाळेतील कलादालन येथे शाळेचे मुख्याध्यापक एन .आर. पाटील. यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी कलाशिक्षक सुनील भिवसने , सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक रहीम तडवी, राजेश बांठिया , क्रीडा शिक्षक संजय करंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध कांतायन यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

























