वाचन आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवते’ – डॉ. अतुल देशमुख

वाचन आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवते’ – डॉ. अतुल देशमुख

पाचोरा दि. 16 – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी व ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील व प्र. प्राचार्य मराठी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या संकल्पनेतून दि. 15 ऑक्टोबर 2022, शनिवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी ग्रंथालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ग्रंथपाल प्रा. पी. एम. डोंगरे उपस्थित होते.
त्यानंतर सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांचे *’वाचन आपल्याला काय देतं’* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट उलगडण्यासोबतच वाचन आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवते असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सतत वाचत राहिला हवे, आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. ज्यांची आज आपण जयंती साजरा करत आहोत ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हेदेखील वाचनातूनच समृद्ध झाले आहेत. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्रांसोबतच वर्तमानपत्रे आणि नियतकालिके देखील वाचली पाहिजेत. जेणेकरून आपल्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून वाचनाला सुरुवात केली पाहिजे. हा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी शालेय पुस्तकांसोबत इतर प्रेरणादायी पुस्तकांचेही वाचन केले पाहिजे असा विचार मांडला. सर्व महापुरुष वाचनानेच मोठे होऊ शकले हे आपण विसरून चालणार नाही असे सांगितले.
याप्रसंगी प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डाॅ. माणिक पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. इंदिरा लोखंडे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. उर्मिला पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. विशाल पाटील व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अधिकराव पाटील तर सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले. तर श्री. बी. जे. पवार, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. प्रविण खेडकर, श्री. बापू पवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.