पाचोऱ्यात लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट,येथील ढोल ताशे व लोखंडी साहित्याची चोरी

पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट ,बाजोरिया नगर येथून ढोल ताशे व लोखंडी साहित्याची चोरी

पाचोरा – येथिल पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट ,बाजोरिया नगर येथून ढोल ताशे व लोखंडी साहित्य चोरी झाल्याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देण्यात आली असून त्याबाबतची पुढील कारवाई सुरू आहे.

पाचोरा नव्हें तर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेला पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट मंडळ येथून गणपती मूर्ती जवळील असलेले मंडळाचे साहित्य चोरी गेलेले असल्याचे समजते.ढोल ताशा रूपये आठ हजार किमतीचे व इतर लोखंडी साहित्य दोन ते तीन हजार, गणपती जवळचे सामान असे ऐकून अंदाजित बारा ते तेरा हजार रकमेचे साहित्य काही भंगार वेचणारे महिला अथवा पुरुष यांनी चोरी केलेली असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे.

सदर कॉलनी एरियामध्ये दोन महिला व दोन मुली असे कायम कचरा साहित्य अथवा भंगार वेचण्याचे काम नित्य दीनचर्याने सकाळी करताना स्थानिक रहिवाशांच्या नजरेस पडत असतात व हे सर्व गोळा केलेले साहित्य बचत भवन भडगाव रोडच्या पाठीमागून रिक्षामध्ये भरून ते घेऊन जात असतात असे चित्र कायम दिसत असते त्यांचा हा नित्यक्रम असल्याचे कळते मागील काळातही बाजोरिया नगर स्थित लालबाग राजा ट्रस्ट मंडळ येथून काही महिला लोखंडी साहित्य विनापरवानगी चोरीच्या इराद्याने घेऊन जात असताना स्थानिकांनी रेड हँड पकडले होते परंतु सदर वेळी त्यांना पुढे असे करणार नाही या कबुलीवर सोडले होते.असे मंडळाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी माहिती देताना सांगितले. परंतु दिनांक 15/10/ 2022 रोजी सकाळी गणपती मंडळाचे साहित्य चोरी झाल्याचे लक्षात आले असून वरील वर्णन केलेल्या साहित्य मिळून येत नाही त्यामुळे सदर साहित्य कुणी अज्ञात व्यक्तींनी/महिलांनी चोरून नेले आहे अशी खात्री झाली असून या चोरीचा तपास लवकरात लवकर करून चोरांना पकडणे व चोरीचा मुद्देमाल पाचोरा लाल बाग राजा चॅरिटेबल ट्रस्टला परत मिळवून देणे या बाबतची चोरीची फिर्याद दाखल करून घेणे साठी अध्यक्ष राहुल जैन यांनी पोलिसात तक्रार अर्ज सुपुर्द केलेला आहे. व पुढील काळात अशी घटना घडू नये यासाठी उपाययोजना करणार असल्याचे कळविले आहे.