शिक्षक सेना अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष पदी शेख जावेद यांची निवड

पाचोरा तालुक्यात नवनियुक्त शिक्षक सेना कार्यकारिणी बैठक मधून शिक्षक सेना अल्पसंख्यांक पदावर शेख जावेद रहीम यांची निवड करण्यात आलेली आहे. शिक्षक सेना ही संघटना शिक्षकांचे हक्कासाठी व न्याय मिळण्यासाठी कार्य करतो. शेख जावेद शिक्षण क्षेत्रात ऍक्टिव्ह टीचर म्हणून आपली ओळख राखतो व सतत शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावा यासाठी प्रयत्न करतो. तो *गरीब नवाज फाऊंडेशन* द्वारे मुस्लिम समाज मध्ये शिक्षणाच्या फैलाव व सामाजिक काम ही करतो. या नियुक्तीनंतर तालुक्यात उर्दू शिक्षकांचे अडकलेले कार्य होऊन त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे. यावेळी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा भडगाव मतदार संघ यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी संघटनाचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष श्री नरूभाऊ सपकाळे , सरचिटणीस नानाभाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील , जिल्हा कोषाध्यक्ष टिकारामसिंग , तालुका अध्यक्ष श्री गणेश पाटील सरचिटणीस अनिल वराडे आदि मान्यवरांसह असंख्य शिक्षक बंधू कार्यक्रमास उपस्थित होते.माननीय जावेद यांच्या नियुक्ती नंतर तालुक्यातील तसेच नगरदेवळा गावातील शिक्षक मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.*