माई मंडळ व शिंदे अकॅडमी आयोजित पाचोऱ्यात प्रफुल्लोत्सव -2022 उत्साहात संपन्न

पाचोर्‍यात प्रफुल्लोत्सव 2022 उत्साहात

माई मंडळ व शिंदे अकॅडमी आयोजित
पाचोऱ्यात प्रफुल्लोत्सव -2022 उत्साहात

पाचोरा- येथील “माई मंडळ” व “शिंदे अकॅडमी” आयोजित प्रफुल्लोत्सव 2022 हा नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा झाला. भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे व साई इन्फ्रा चे संचालक तथा उद्योजक प्रफुल्ल संघवी यांच्या प्रेरणेने संपन्न झालेल्या या नवरात्र उत्सवात संपूर्ण नऊ दिवस सहभागी स्पर्धक, लहान मुले व सामान्य दर्शक व हजारो देवी भक्तांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

प्रफुल्लोत्सव 2022 मध्ये दररोजच्या गरबा आणि दांडिया रास नृत्यासोबतच विविध धार्मिक तसेच सामान्य ज्ञान विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला स्पर्धकांसोबतच दर्शकांना सुद्धा बक्षीसे पटकावण्याची संधी देण्यात आली. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आयोजकांतर्फे सन्मानचिन्ह, हजारो रुपयांची रोख बक्षिसे, तसेच के.के. ग्रुप पाचोरा यांचे तर्फे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला गिफ्ट आर्टिकल आणि भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे कडून प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहन पर सन्मानाचिन्ह देण्यात आली.

या उत्सवात सहभागी अनेक प्रायोजकांनी सुद्धा प्रेक्षकांवर बक्षिसांचा वर्षाव केला व त्यांच्या विविध उत्पादने, कोर्सेस, ग्राहक योजनांवर सवलती जाहीर केल्या.

प्रफुल्लोत्सव 2022 च्या यशस्वीतेसाठी माई मंडळाचे अध्यक्ष नंदू प्रजापत, उपाध्यक्ष शिवाजी आव्हाड, सचिव शैलेश खंडेलवाल, खजिनदार बंकट भाई लढे, आधारस्तंभ टोकरसी पटेल, राजेश बाबूजी मोर, नवीनचंद्र कोटेचा, राजेश बोथरा, जवाहर शेठ (केके ग्रुप), तसेच माई मंडळाचे सदस्य नयना पंजाबी, निलेश कोटेचा, राधेश्याम दायमा, राकेश लाहोटी, अनिल चंदवाणी, मनीष परमार, हिम्मत पटेल, योगेश सांघवी, भावेश पटेल, शैलेश पटेल, अरुण गौड, जयेश कोटेचा, यांचे सोबतच शिंदे अकॅडमीचे रुपेश शिंदे ऍडव्होकेट योगेश पाटील, शिवाजी शिंदे, सिद्धांत पाटील, राहुल बावचे, हिमांशू जैन, नीरजभाई जैन, सचिन बोरसे व अमोल नाथ यांनी परिश्रम घेतले. दांडिया व गरबा रास स्पर्धेचे परीक्षक म्हणून अरुण गौड, बिमल बेन लोडाया, दर्शना वसंत, यांनी काम पाहिले तर या उत्सवातील महिला महिलांना सौ. पूजाताई शिंदे, हेतल कोटेचा, ललिता पाटील, रेखा मोर, नर्मदाबेन पटेल, जया खंडेलवाल, माहेश्वरी रावल, ममता वसंत, शारदा केसवानी, इची मोर आदींनी सहकार्य केले.

प्रफुल्लोत्सव 2022 च्या यशस्वीतेत भुसावळ येथील ध्वनी व्यवस्थापक चंदन साऊंड, तसेच नाशिक येथील ज्योती केदारे दिग्दर्शित ऑर्केस्ट्रा सुर -ज्योती, अल्टिमेट फोटो स्टुडिओ व लोक संवाद न्यूज यांचे मोलाचे योगदान होते. प्रा शिवाजी शिंदे व शैलेश खंडेलवाल यांनी संपूर्ण नवरात्रीत भावपूर्ण व ओघवते सूत्रसंचालन केले. समारोपाच्या रात्री युवा नेते अमोल शिंदे यांनी सर्व सहभागी व्यक्ती- समूह, घटकांचे, माता-भगिनींचे आभार प्रकट केले. पाचोरा भडगाव तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व मान्यवरांनी प्रफुल्लोत्सव 2022 ला भेट देऊन उत्साह वाढवला