पाचोरा शहर येथे ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा

पाचोरा शहर येथे ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा

 

पाचोरा शहर येथे ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आली. या दिवशी इस्लाम धर्मचे पैगमबर हजरत मोहम्मद यांच्या जनम दिवस आहे, हया कारणाने त्यांचे अनुयायी या दिवसाला ईद मीलाद महणून साजरा करतात. आपल्या घर व गली महोलला सजवतात. पाचोरा शहर मध्य हि त्यांचे अनुयायी यांनी जुलूस (मिरवणूक) काढून ईद-ए-मिलाद साजरा केला. गावातील सर्व मुस्लिम समाजातील लोक नूर मस्जिद आठवडे बाजार येथे एकत्रित झाले व येथून जुलूस (मिरवणूक) ची सुरुवात झाली. हुसैनी चौक, देशमुख वाडी, शिवाजी चौक, मुल्ला बाळा येथे घुमुन शेवटी जुलूस नूर मस्जिद कडे आला. या वेळी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील, सचिन सोमवंशी, मुकुंद बिलदिकर, संजय गोईल,लोकांना ईद मिलाद ची शुभेच्छा देण्यासाठी नूर मस्जिद येथून पोहोचले.आमदार साहेबांचा हस्ते सर्व उलेमा (मौलवी साहेब) यांच्या फुल व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मौलाना जिशान रजा यांनी पैगंबर मोहम्मद यांचे जीवनीवर प्रकाश टाकले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीचे शुभेच्छा दिली. शेवटी आपले देश भारत मध्ये एकात्मता, बंधुत्व, व शांतता निर्माण होण्यासाठी दुआ (प्रार्थना) वर कार्यक्रमचा समापन झाला. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रम मध्ये डी वाई एस पी साहेब,पाचोरा तालुक्याचे पोलीस इन्स्पेक्टर, पी एस आय मोरे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम मध्ये मस्जिद नूरचे अध्यक्ष महमूद खान, उपाध्यक्ष जाकीर खाटीक,जहांगीर पिंजारी,मौलाना जिशान रजा, मौलाना नईम रजा, इकराम रजा,जुबेर रजा, हसनैन रजा, जावेद रहिम, अरशद रजा, इक्बाल रजा, डॉक्टर इमरान पिंजारी,वहाब बागवान, उस्मान खाटिक, सलाम टकारी, सलीम मानियार, अफजल मनीयार, अजहर मोतीवाला, शाफियोद्दिन मंसूरी, रज्जू बागवान,पोलिस प्रशासनचे लोक, व मोठी संख्या मध्ये लोक उपस्थित होते.