आ. सत्यजीत तांबेंच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरीवर तरुणांचे श्रमदान

आ. सत्यजीत तांबेंच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरीवर तरुणांचे श्रमदान

– सत्य’म’ ‘शिव’म’ ‘श्रम’दानम असणार कार्यक्रमाची थीम

– आ. सत्यजीत तांबे मित्र परिवाराकडून कार्यक्रमाचे आयोजन

– २७ सप्टेंबरला किल्ले शिवनेरीवर श्रमदान

 

प्रतिनिधी,

 

राज्यातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीम राबवण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी आ. सत्यजीत तांबे यांचा वाढदिवस आहे. आ. तांबेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्र परिवाराने किल्ले शिवनेरी येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून श्रमदान करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमाची थीम सत्य’म’ ‘शिव’म’ ‘श्रम’दानम असणार आहे.

 

आ. सत्यजीत तांबेंच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या श्रमदानाला राज्यातून अनेक तरुण – तरुणी किल्ले शिवनेरी येथे येणार आहेत. सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व श्रमदान अभियान राबवले जाणार आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सांगणारे नाटक व पोवाडे सादर होणार आहेत. यानंतर आलेल्या सर्व तरुणांना राज्यभरातील सर्व गड किल्ले संवर्धनाच्या स्वच्छता व संवर्धनाची शपथ दिली जाणार आहे. या दिवशी उपस्थित हजारो युवक स्वच्छता व श्रमदानाचा महासंकल्प घेऊन पुढे देखील काम करणार आहेत.

 

हा अभिनव उपक्रम नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असून या स्वच्छता व श्रमदान अभियानात राज्यभरातील हजारो युवक व युवतींनी मोठा सहभाग नोंदवावा असे आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

 

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी हे संबंध महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त या ऊर्जास्थानी जाऊन विचार मंथन करूया, श्रमदान करूया अशी संकल्पना माझ्या मित्र परिवाराने मांडली. ही संकल्पना मला खूपच आवडल्याने मी त्याला तत्काळ होकार दिल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.