भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा ग्रामीण उपाध्यक्षपदी सौ ललिता पाटील यांची निवड

पाचोरा ( प्रतिनिधी )  अनिल आबा येवले.

पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रगण्य असणारे नवरात्र असो किंवा महिलांचे सण असो नेहमी सहकार्याची भूमिका तसेच महिला वरील होणाऱ्या अन्यायावर मदत करण्यासाठी तत्पर हजर असतात सौ ललिता पाटील यांनी पती-पत्नी यांच्यात होणारा वाद किंवा घरगुती भांडण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्या सौ ललिता पाटील यांनी तडजोडीची भूमिका स्वीकारू संसार जोडण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात त्या महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा समितीच्या जिल्हा अध्यक्ष असून गोरगरीब महिलांना नेहमी मदत करण्यास पुढे असतात. मुलींच्या समस्या जाणून घेण्यात व त्या व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी नेहमी अग्रक्रम देतात त्यांच्या या सर्व कामाची दखल भारतीय जनता पार्टी पक्षाचे फादर बॉडीचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी दखल घेऊन चांगल्या कामाची पावती म्हणून सौ ललिता पाटील यांची पाचोरा तालुका ग्रामीण भारतीय जनता पार्टी फादर बॉडीच्या उपाध्यक्षपदी निवड केली असून त्यांची ही निवड जळगाव येथील आमदार श्री सुरेश मामा भोळे खासदार उमेश दादा पाटील जिल्हा परिषद सदस्य श्री मधुकर भाऊ काटे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ सदस्य श्री सतीश बापू शिंदे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री कांतीलाल जैन भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील भाजपा तालुका अध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे भाजपा शहर अध्यक्ष श्री रमेश वाणी तसेच भाजपा शहराध्यक्ष ज्योतीताई भामरे..तसेच महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा समितीच्या पाचोरा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्याची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे