डॉ. यशवंत पाटील यांनी त्यांच्या संस्थेमार्फत जनावर यांना होणाऱ्या लंपी आजारावर मोफत लस देण्याचा उपक्रम करून माणुसकी दाखवली त्यांच्या या माणुसकीचे दर्शन घडविले

डॉ. यशवंत पाटील यांनी त्यांच्या संस्थेमार्फत जनावर यांना होणाऱ्या लंपी आजारावर मोफत लस देण्याचा उपक्रम करून माणुसकी दाखवली त्यांच्या या माणुसकीचे दर्शन घडविले

( पाचोरा प्रतिनिधि अनिल आबा येवले )

खडकदेवळा बु.|| येथे डॉ. वाय. पी. युवा फाउंडेशन व साईनाथ सार्वजनिक वाचनालया तर्फे लंंपी चा धोका टाळण्यासाठी जनावरांना मोफत लसीकरण शिबीर.

पाचोरा. तालुक्यातील खडकदेवळा बु.|| येथे डॉ. वाय.पी. युवा फाउंडेशन व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया मार्फत लंंपी स्कीन डीसीज या गुरांवर आलेल्या संसर्ग जन्य आजाराचा धोका टाळण्यासाठी मोफत लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. गावातील ४३८ गुरांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले. सर्व प्रथम फॉऊंडेंशन चे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील. वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. ऊषाबाई पाटील, वाचनालयाचे संचालक श्री विश्वास पाटील, संजय निकम, देवचंद गायकवाड, भैय्या साठे, प्रमुख अतिथी डॉ. सुजाता सावंत मॅडम पशू वैद्यकीय अधिकारी वर्ग १. पाचोरा, कार्यक्रमाचे उद॒घाटक सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. दिलीप शिंपी साहेब. गाळण येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिंधू परदेशी साहेब. डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. वाल्मीक पाटील, खडकदेवळा बु.|| चे सरपंच प्रवीण निकम, या मान्यवरांच्या उपस्थितीत गो-पूजन करून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना फाउंडेशनने पशू वैद्यकीय दवाखान्यातून गोठा निर्जंतुकीकरण फवारणीसाठी सायपरमेथरीन औषध उपलब्ध करून दिले.

उपस्थित शेतकऱ्यांना लंपी आजाराविषयी मार्गदर्शन करतांना मा. पशू वैद्यकीय अधिकारी दिलीप शिंपी साहेब म्हणाले की लंंपी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जनावरांना गोचीड, चिलटे, माशा, डास, आदी किटकांच्या च्यां चावण्यामुळे होतो. त्या साठी पशू मालकांनी गोठ्यातील भिनभिनणाऱ्या माशांचा बंदोबस्त करावा, बाधीत गुरांची लक्षणे मध्ये गुरांचे पाय सूजणे, शरीरावर जागोजागी गाठी बांधल्या जातात. चारा न खाने, जनावरांच्या नाका तोंडातून निघणारा स्त्राव हे पाणी व चारा दूषित करते, ज्या गुरांच्या अंगावर गाठी आहेत त्यांना इतर गुरां सोबत गोठ्यात एकाच ठिकाणी बांधू नये. किंवा सार्वजनिक हौदामध्ये पाणी पाजू नये. गुरांच्या आजूबाजूला घाण पाणी साचू देऊ नये. गुरांचा गोठा स्वच्छ व परिसर स्वच्छ ठेवावा. अशा वेळेस आधी गुरांवर औषधी फवारणी करणे व लसीकरण गरजेचे आहे.व जनावरांच्या कोणत्याही समस्या वर ताबडतोब पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ यशवंत पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व ग्रामस्थांनी देखील जनावरांना मोफत लसीकरण उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. रविंद्र पाटील, डॉ. अनंत पाटील, डॉ. जगदिश पाटील, डॉ. प्रदीप ब्राह्मणे. डॉ. राजू तेली, डॉ. रवी पाटील, डॉ. सार्थक पाटील. खडकदेवळा बु.|| ग्रामपंचायत. सर्व सदस्य आणि सरपंच प्रवीण निकम, आनंदा बाबा. ठाकरे, प्रकाश पाटील, सुभाष बाबा ठाकरे, धर्मराज सुर्यवंशी, शिवाजी ठाकरे, वि.का.सो. चेअरमन बारकू सुर्यवंशी, भालचंद्र ठाकरे, संभाजी देवरे. गावातील सर्व युवा वर्ग व जेष्ठ नागरिक वाचनालयाचे आणि फाउंडेशनचे सर्व सदस्य इ. नी परीश्रम घेतले, आभार प्रदर्शन संजय निकम यांनी केले.