पाचोऱ्यात सचिन सुप्रिया च्या जोडीने नवकार प्लाझा गणेश मंडळाची केली स्थापना

पाचोऱ्यात सचिन सुप्रिया च्या जोडीने नवकार प्लाझा गणेश मंडळाची केली स्थापना

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील भडगाव रोड वरील राजे संभाजी महाराज भुयारी मार्गा लगत असलेल्या नवकार प्लाझा गणेश मंडळाच्या श्री गणेश स्थापना धुमधडाक्यात करण्यात आली.

शहरातील नवकार प्लाझा गणेश मंडळ सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश स्थापना केली आहे. यावेळी स्थापना सचिन – सुप्रिया या जोडीने केली आहे. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व त्यांच्या पत्नी सुप्रीया सोमवंशी या दोघांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे राहुल शिंदे, संदीप पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, सुधीर गोडसे, जगदीश पाटील, शाम डागोर आदी उपस्थित होते