गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी तर्फे आयोजित आंतर शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेस शानदार सुरुवात

गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीतर्फे आयोजित आंतर शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेस शानदार सुरुवात…!!!!!

जळगाव (वार्ताहर) – श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी,जळगाव,आयोजित,स्व.लक्ष्मण धुडकू पाटील,स्मृती प्रित्यर्थ १४ वर्षाआतील जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन दिनांक ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने,जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत,त्याचे उद्घाटन आज रोजी आ.राजुमामा भोळे,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,निळकंठ गायकवाड,दिपक सुर्यवंशी,डी.डी.बच्छाव,नामदेव सोनवणे,राहुल पोळ,विद्या कलंत्री,ढाके मॕडम आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेत प्रथमदिनी पार पडलेल्या स्पर्धेत मुलांच्या ब गटात ओं.गो.पाटील,विद्यालय,बिडगाव वि.वि.सेंट लॉरेंन्स हायस्कूल,जळगाव,मुलींच्या गटात सेंट लॉरेंन्स हायस्कूल वि.वि.श्री गणपतराव पोळ,क्रीडा विकास प्रबोधिनी,जळगाव,आर.आर.विद्यालय,जळगाव वि.वि.सेंट लॉरेंन्स हायस्कूल,जळगाव,एस.बी.संघवी इंटरनॅशनल स्कूल,उत्राण,वि.वि.श्रीराम माध्यमिक विद्यालय,जळगाव आदि सामने सकाळच्या सत्रात पार पडले,५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अंतिम सामने पार पडल्यावर रविवारी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.
स्पर्धा यशस्वी होणेसाठी स्पर्धा प्रमुख गुरुदत्त चव्हाण,नामदेव सोनवणे,अनंता समदाणे,अनिल माकडे,राहुल पोळ,चंद्रकांत महाजन आदिंच्या मार्गदर्शनाखाली गोपाल पवार,हर्षल बेडीस्कर,स्वप्निल चौधरी,महेश पाटील,रोहीत महाजन,प्रेमचंद चौधरी,दिलीप चौधरी,दत्ता महाजन,हेमंत ठाकूर,निरंजन ढाके आदि तसेच गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीचे खेळाडू मेहनत घेत आहे.