‘राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत’ धुळ्याचा धर्मेश हिरे प्रथम

‘राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत’ धुळ्याचा धर्मेश हिरे प्रथम

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात दि.२५ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता ‘कै.ना.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) राज्यस्तरीय वरिष्ठ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ उदघाटन हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकासकाका हरताळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच माजी शिक्षणमंत्री कै.ना. अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील उपस्थित होत्या.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.संध्याताई नरेश महाजन, माजी नगरसेविका सौ. सुप्रियाताई कांतीलाल सनेर, ग. स.सोसायटी जळगावचे माजी संचालक श्री. रमेश एकनाथ शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे तसेच परीक्षक आर.सी.पटेल महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर चौधरी व प्रताप महाविद्यालयातील सहा. प्राध्यापक योगेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी रविंद्र महाजन व नेहा दगळू सोनगीरे यांनी गायलेल्या सुरेल स्वागत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्तृत्व मंडळ प्रमुख डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले.
याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना हरताळकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकासकाका हरताळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चांगल्या वक्तृत्व शैलीसाठी मनन, चिंतन, वाचन करायला हवे. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकण्यातून व चांगल्या साहित्यकृती वाचण्यातून वैचारिक प्रगल्भता येते व आपोआपच वक्तृत्व शैली सुधारण्यास मदत होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उत्तम विषयांवर स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनामागची पार्श्वभूमी व महत्व विशद केले.
या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचलन डॉ.आर. आर.पाटील यांनी केले तर आभार श्री.डी.डी. कर्दपवार यांनी मानले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. रोहिणी सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखा किशोर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनिषा राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. छाया हितेंद्र देशमुख तसेच चोपडा शहरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ.एस.टी.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, परीक्षक डॉ. सुधाकर चौधरी, प्रा. योगेश पाटील व सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पारितोषिक वितरणापूर्वी धर्मेश हिरे व आलासे हर्षवर्धन या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनाविषयी व स्पर्धकांच्या वक्तृत्व शैलीविषयी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी परीक्षक डॉ.सुधाकर चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्वासाठी भरपूर वाचन व चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकून त्याचा सराव करावा. उत्तम वक्तृत्वासाठी स्पष्ट मत मांडणी, निर्भीडपणा, आत्मविश्वास, प्रचंड वाचन, मनन व चिंतनाची गरज आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील १४ स्पर्धक सहभागी झाले होते.त्यात हिरे धर्मेश साहेबराव (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे) प्रथम, सोनार निर्भय धनंजय (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) द्वितीय, आलासे हर्षवर्धन चंद्रकांत (आबेदा इनामदार सिनीअर कॉलेज, पुणे) तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आले. यात कंकाळे महेश शालीग्राम (कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा) उत्तेजनार्थ प्रथम, पाटील तेजल सुभाष (श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा) उत्तेजनार्थ द्वितीय आणि सोनवणे धनश्री गोकुळ (आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर) उत्तेजनार्थ तृतीय हे बक्षिसांचे मानकरी ठरले असून त्यांना अनुक्रमे ५०००/-, ३०००/-,२०००/- व १०००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या निकालाचे वाचन उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांनी केले.
या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ.सुधाकर चौधरी, शिरपूर व प्रा. योगेश पाटील, अमळनेर यांनी जबाबदारी पार पाडून विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शनही केले.
या स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वक्तृत्व मंडळ सदस्य श्री.डी.डी.कर्दपवार, श्री.एम.बी. पाटील, डॉ. संगीता पाटील, श्री.के.एम.खंडाळे, श्री.जी.बी.बडगुजर, शाहीन पठाण, सौ.पी.आर.दाभाडे यांच्यासह माहेश्वरी धनगर, माया धनगर, नेहा धनगर यांनी परिश्रम घेतलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.आर.पाटील यांनी केले तर आभार वक्तृत्व मंडळ प्रमुख डॉ. एम.एल.भुसारे यांनी मानले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.