सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पाचोरा अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पाचोरा अध्यक्षपदी आमदार किशोर आप्पा पाटील

 

पाचोरा येथे दिनांक 30 जानेवारी वार गुरुवार रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक पार पडली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली शिवजयंती सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमात उत्साही वातावरणात साजरी करण्याचे ठरले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले तसेच या मिटींगला मार्केट कमिटी सभापती गणेश पाटील मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष एस के पाटील तालुकाध्यक्ष सुनील पाटील रंजीत पाटील सर नितीनदादा तावडे किशोर बारवकर नंदू पाटील संजय भाऊ गोहिल चंद्रकांत धनवडे मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष किशोर पाटील सुनील भाऊ शिंदे किशोर डोंगरे संभाजी ब्रिगेडचे विविध पदाधिकारी उदयनराजे समर्थक ग्रुप जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ प्रवीण ब्राह्मणे तसेच शहरातील सर्व पुरोगामी संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी सुनील भाऊ शिंदे व प्रवीण ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख मनोगतात शिवजयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष माननीय किशोर आप्पा पाटील यांनी या वर्षाची शिवजयंती अतिशय उत्साहात व झोकातपार पाडली जाईल असे आश्वासित केले व पूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले याच कार्यक्रमात डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांचा एफ एम जी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए पाटील सर यांनी केले.