जय हिंद लेझीम मंडळ श्रीगणेश मूर्ती विसर्जन करता पाचोरा पोलिस यांना देऊन केले प्रशासनाला सहकार्य

जय हिंद लेझीम मंडळ श्रीगणेश मूर्ती विसर्जन करता पाचोरा पोलिस यांना देऊन केले प्रशासनाला सहकार्य

पाचोरा शहरात गणेश उत्सव श्रीमुर्ती विर्सजन दि. १९/०९/२०२१ रोजी असुन सर्व गणेश भक्तांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येते की, कोणत्याही गणेश मंडळांना विर्सजन मिरवणुक काढता येणार नाही. विर्सजन मिरवणुक काढल्यास त्यांचे वर सक्त कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासन केले होते तसेच गणेश भक्तांनी विर्सजन प्रक्रिया सकाळी लवकर सुरु करावी तसेच घरगुती गणेश भक्तांनी गणेश मुर्ती जवळच्या न.पा. संकलन केंद्र किंवा स्वयंसेवी संघटनांचे सकंलन केंद्रावर जमा करावेत. जय हिंद लेझीम मंडळाच्या कार्यकर्ता श्रीची मूर्ती विसर्जन करता देत असताना पाचोरा पोलिस स्टेशनचे विकास पाटील साहेब,गणेश चौबे साहेब,सुनिल पाटील,किशोर पाटील,होमगर्ड कपिल पाटील,लक्ष्मण पाटील,शुभम कोळी,शितल पाटील,तसेच जय हिंद लेझीम कार्यकर्ता.प्रा.प्रदीप वाघ,सुदर्शन सोनवणे,संदीप मराठे,प्रा. नितीन पाटील,मयुर महाजन,राहुल पाटील,विनोद पाटील,गणेश पाटील,मनोज पाटील,व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.