वाघोली येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आणि दातीर वस्ती येथील हनुमान मंदीरात पारायण सोहळा संपन्न

वाघोली येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आणि दातीर वस्ती येथील हनुमान मंदीरात पारायण सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तर दातीरवस्ती येथील हनुमान मंदीरात पारायण सोहळा संपन्न झाला.
पंढरीचे निष्ठावान वारकरी संत यादव बाबा वाघोलीकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आणि ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे ६ ते १४ फेब्रुवारी २०२६ या काळात आयोजन करण्यात आले आहे.वरील काळात पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी प्रवचन, सायंकाळी हरीपाठ आणि रात्री हरी किर्तन व नंतर हरीजागर वरील प्रमाणे या सोहळ्याची रुपरेषा ठरवण्यात आली आहे.सर्व ह.भ.प. विष्णूपंत भालेराव,महेश महाराज आव्हाड, कृष्णा ताठे, हरीश्चंद्र महाराज दगडखैर,नवनाथ महाराज शिरसाठ,अंकुश महाराज कादे, कल्याण महाराज शिंदे,यांची दररोज ४ ते५ या वेळेत प्रवचने होणार आहेत.तर सर्व ह.भ.प.हंसराज महाराज मगर, महंत बाबागीरी महाराज, शिवनाथ महाराज मैंदड,सुमंत महाराज,भगवान महाराज मचे, निवृत्ती महाराज मतकर,भालसिंग महाराज वाघोलीकर, भगवान महाराज जंगले शास्त्री,यांची किर्तने होणार आहेत.शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. महंत राम महाराज झिंजुर्के यांचे काल्याचे किर्तन होउन महाप्रसादा नंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे.वरील काळात शेळके, झिंजुर्के,डोळसे, गाडगे,वांढेकर, दहीवाळकर, वारघडे,भालसिंग, पवार,सरगर, जर्हाड,आगलावे, या परीवाराच्या वतीने दररोज अन्नदान करण्यात येणार आहे.वाघोली -जवखेडे शिवारातील मायनर क्रमांक ८ दातीर वस्ती येथे ही २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहातील सर्व कार्यक्रम यशस्वी झाले.सर्व ह.भ.प.तुकाराम महाराज केसभट, अभिमन्यु महाराज भालसिंग, बाळासाहेब महाराज भालके, धनंजय महाराज उदावंत,महादेव महाराज कोरे, दत्तात्रय महाराज जगताप, कारभारी महाराज झरेकर,यांची किर्तने झाली.माळवी पिंपळगाव येथील ह.भ.प.हरीभाउ महाराज भोंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.समस्त ग्रामस्थ,वाघोली दातीर वस्ती, मायनर क्रमांक ८ येथील सर्व भाविकांनी या सोहळ्यास दररोज हजेरी लावली होती आणि विषेश परीश्रम घेऊन हा सोहळा यशस्वी केला होता.या दोन नाम सोहळ्यामुळे संपूर्ण वाघोली गाव हे भक्तीमय झालेलं पहावयास मिळाले.