बाजार समितीमध्ये बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात:सभापती गणेश पाटील यांचे हस्ते शुभारंभ

बाजार समितीमध्ये बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात; सभापती गणेश पाटील यांचे हस्ते शुभारंभ

पाचोरा (वार्ताहर) दि,२२
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन संचालक मंडळाने लहान सहान कामातुन आपल्या कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केली असून कर्मचारी हितासाठी अचूक बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला असून यामुळे वस्तुनिष्ठ हजेरीची नोंद होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांवर वेळेचे बंधन पाळावे लागणार असल्याने बाजार समितीच्या एकूणच कार्यप्रणालीत सुधारणा होणार आहे.
या बायोमेट्रिक प्रणालीचा शुभारंभ गुरुवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभापती गणेश पाटील यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपसभापती पी ए पाटील, संचालक प्रकाश तांबे, संचालक तथा शिवसेना तालुका प्रमुख सुनिल पाटील, राहुल पाटील सचिव बोरुडे यांचेसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.कर्मचाऱ्यांनी शेतकरी हितासाठी काम करत बाजार समितीच्या लौकिकात भर घालून समितीच्या भरभराटीसाठी सामूहिक प्रयत्न कारावेत असे आवाहन यावेळी सभापती गणेश पाटील यांनी केले.

शुक्रवारी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव, ग्रामीण रुग्णालय पाचोरा व राष्ट्र विकास मायग्रेंट टी आय संस्था अमळनेर जळगाव(Ngo) यांच्या वतीने रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता :कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिक, हमाल मापाडी यांच्यासाठी रक्त तपासणी शिबिर कॅम्पचे आयोजन केले असून सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन सभापती गणेश पाटील एनजीओ समुपदेशक अमोल सूर्यवंशी यांनी केले आहे.