कॉंग्रेस आपल्या दारी उपक्रमात पाचोऱ्यात घरोघरी दिले रेशनकार्ड नागरिकांनी केला पदाधिकारींचा सन्मान

” कॉंग्रेस आपल्या दारी” उपक्रमात पाचोऱ्यात घरोघरी दिले रेशनकार्ड :नागरिकांनी केला पदाधिकारींचा सन्मान

पाचोरा (प्रतिनिधी) –
” कॉंग्रेस आपल्या दारी” या सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून कॉंग्रेस पदाधिकारींनी शहरात घरोघरी जाऊन रेशनकार्ड वाटप केले.
परीसरात या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

पाचोरा शहरातील नागरिकांना अनेक समस्या आहेत या समस्या त्यांच्या घरी जाउन सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या,, ” कॉंग्रेस आपल्या दारी ” ‘ या संकल्पनेतून नागरिकांना रेशनकार्ड वाटप त्यांच्या घरापर्यंत जाउन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी समवेत तालुका ओबीसी सेल अध्यक्ष इरफान मणियार, शहर उपाध्यक्ष अॅड. वसिम बागवान, शहर ओबीसी सेल अध्यक्ष शरीफ शेख,
एसटी सेल चे रवी सुरवाडे,
, संदल शहा, जलील शहा, मुजाहीद शेख, आमिन शेख, शेख इब्रानखान युनुस खान, इरफान पठाण, सादीक शेख, साबीर शेख,
आदी उपस्थित होते. यावेळी बाहेरपुरा भागातील कुर्बान नगर, रसुल नगर, मुल्ला वाडा, अक्सा नगर, पिंजार वाडा, आदी परिसरातील नागरिकांनी रेशनकार्ड देण्यात आले. यावेळी नागरिकांनी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचा सत्कार केला. अनेक वर्षेपर्यंत जे नागरिक कागदपत्रे घेऊन भटकत होते काहींची खाजगी एजंटाकडुन फसगत देखील झाली होती अशा नागरिकांचे कॉंग्रेस पदाधिकारी यांनी कागदपत्रे घेऊन महसूल विभागाच्या वतीने नवीन रेशनकार्ड काढुन दिले या बद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत होते. तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की, पाचोरा काँग्रेस ने ” कॉंग्रेस आपल्या दारी ” या उपक्रमात नागरिकांच्या घरी जाऊन त्याच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते कटिबध्द असुन ज्या नागरिकांना समस्या असतिल त्यांनी कॉंग्रेस पदाधिकारींसह कार्यकर्ते यांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे. या उपक्रमात तहसीलदार कैलास चावडे यांचे आभार मानले.