श्री सु. भा .पाटील प्रा .वि .मंदिर पाचोरा शिक्षक दिन साजरा करण्यात आला

श्री सु. भा .पाटील प्रा .वि .मंदिर पाचोरा
शिक्षक दिन साजरा करण्यात आला

आज विद्यालयात दिनांक 05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती जयश्री पाटील मॅडम होत्या त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाइन मनोगतातून शिक्षकांविषयी भरभरून भाषणातून माहिती सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून पाठ सुद्धा घेतले तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील श्री स्वप्निल माने सर यांनी विद्यालयास अडीच हजार रुपयांची पुस्तके बाल वाचनालयास भेट म्हणून दिली! याप्रसंगी पुस्तक भी. सी च्या संचालिका श्रीमती सारिका पाटील मॅडम विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री नारायण सोनवणे सर हे देखील उपस्थित होते .तसेच खाजगी प्राथमिक पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री अजय सोमवंशी सर यांनी राकेश पाटील सर यांच्यामार्फत शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षकांना भेट कार्ड व पेन देऊन सन्मानित केले सूत्रसंचलन श्री मनोज पवार सर यांनी तर आभार श्री अभिजित महालपुरे सर यांनी केले छायाचित्रण आशिष पाटील सर यांनी केले.