नवजीवन विद्यालय पाचोरा येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

पाचोरा येथील मागास विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित नवजीवन विद्यालय पाचोरा येथे दि.१५ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रसंगी इ. ५ वी ते इ. १०वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात आले. कोरोणा संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुक्त पद्धतीने शाळा भरत नव्हत्या. त्यामुळे शालेय वातावरणात विद्यार्थ्यांचाही उत्साह पाहावयास मिळाला.
प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस बी पवार, पर्यवेक्षक बी के पाटील, विद्यालयातील सहशिक्षक एस ए पाटील, आर वाय चौधरी, आर ए साळुंखे, जी के वानखेडे, विकास पाटील, श्रीमती एस एन भदाणे, जे वाय मोरे, सुधाकर पाटील, आर यू राठोड, जगदीश पाटील, सुनील परदेशी, एस एस सोनवणे, जी एस पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, जगन्नाथ निकम, कैलास राठोड,यासह पालक प्रतिनिधी उपस्थित होते.