खासदार सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या कळसच्या निवृत्ती गाडगेच्या पारनेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या

खाखासदार सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या कळसच्या निवृत्ती गाडगेच्या पारनेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या

(सुनिल नजन चिफ ब्युरो अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) ‌ भाजपाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घाला अशी धमकी देणाऱ्या कळस येथील निव्रुत्ती नाना गाडगे यांच्या पारनेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पारनेर तालुक्यातील कळसचे माजी उपसरपंच गणेश काने यांनी विखेपाटील यांना साठ टक्के मत मिळतील असे विचार मिडिया समोर व्यक्त केले होते. ते सहन न झाल्याने कळस येथील माजी पारनेर पंचायत समिती सदस्य निवृत्ती नाना गाडगे यांनी कळसच्या माजी उपसरपंच असलेल्या गणेश काने यांना अर्वाच्य भाषा वापरली होती. या बाबत भाजपाचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये निव्रुत्ती नाना गाडगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजताच निव्रुत्ती गाडगे हे नवी मुंबई येथे असल्याचे त्यांनी एका व्हिडिओ द्वारे सांगितले होते.आणि विखेपाटील यांना दिलेल्या धमकीचा आणि माझा काहीच संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा आणि माझाही काही एक संबंध नसल्याचेही सांगितले होते.परंतू गाडगे हे निलेश लंके प्रतिष्ठानच्या मिडिया सेलचे अध्यक्ष असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.पारनेर तालुक्यातील अनेक हाॅटसाॅप ग्रुपमध्ये लंकेच्या समर्थनार्थ क्लीपा प्रसारित करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच निलेश लंके हे एका खासगी कार्यक्रमात गाडगेंना पेढा भरवत असल्याचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झालेले आहेत.तर गाडगेंचे म्हणणे आहे की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन गाडगे यांचा शिवसेनेच्या शिंदे गटांशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.सोशल मिडीयावरील सर्व पोस्ट पासुन पोलिसांची खात्री झाली आहे की गाडगे हा निलेश लंके यांचाच कार्यकर्ता आहे.पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांनी नवी मुंबई येथुन निव्रुत्ती नाना गाडगे यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगितले आहे. विखेंना गोळ्या घालण्याची भाषा नेमके कोणाच्या सांगण्यावरून वापरली गेली याचा तपास करावा म्हणून भाजपाचे जिल्ह्यातील काही नेते शिवाजी कर्डिले , डॉ. भालसिंग, विठ्ठलराव लंघे, यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन संबंधितावर कडक कारवाई करुन खासदार सुजयदादा विखे पाटील यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे. एकंदरीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.त्यामुळे या मतदारसंघातील ही निवडणूक सर्व सामान्य माणसाला नेमकी कोणत्या वळणावर घेऊन जाणार आहे हे एक न उलगडणारे कोडेच आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची ही लढाई विखे विरूद्ध लंके अशी नसुन विखे विरुद्ध पवार अशीच आहे.म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अहमदनगर जिल्ह्यातील लढतीकडे लागले आहे. निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यापूर्वीच संपूर्ण मतदारसंघात तंग वातावरण निर्माण झाले आहे.