कै.सौ.इंदुबाई दगा पाटील यांच्या स्मरणार्थ जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी पाचोरा यांना शवपेटी अर्पण

कै.सौ.इंदुबाई दगा पाटील यांच्या स्मरणार्थ जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी पाचोरा यांना शवपेटी अर्पण

पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील प्रगतीशील शेतकरी व जेष्ठ नागरिक श्री. दगा देवराम पाटील व पाटील परिवार यांच्या तर्फे कै.सौ.आईसाहेब इंदुबाई दगा पाटील यांच्या पुण्य स्मरणार्थ जय हिंद क्रीडा व लेझीम मंडळ ,कृष्णापुरी ,पाचोरा यांना शवपेटी अर्पण करण्यात आली. जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी जय हिंद लेझीम मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शवपेटी ची आवश्यकता भासल्यास जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाच्या सदस्यांना संपर्क करावा असे आवाहन जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले.