वडिलांच्या स्मरणार्थ कुरंगी येथील निराधार वृद्धाश्रमास केली अकरा हजार रुपयांची मदत

वडिलांच्या स्मरणार्थ कुरंगी येथील निराधार वृद्धाश्रमास केली अकरा हजार रुपयांची मदत

नांद्रा (ता.पाचोरा)ता.21कुरंगी येथील धर्मराज जनसेवा बहुउद्देशीय संस्था संचालित *स्व.सौ.शोभाई निराधार वृद्धाश्रम कुरंगी* ता.पाचोरा जि. जळगांव या ठिकाणी निराधार वृद्धाश्रमचे बांधकाम प्रगती पथावर असतानाच दानशूर वक्तीमत्व श्री. साहेबराव कौतिक महाजन (सर) माध्यमिक शिक्षक अडावद ता.चोपडा जी.जळगांव यांचे वडील स्वर्गीय.आप्पासो कौतिक वना महाजन यांच्या स्मरणार्थ 11, 000 रू ( अकरा हजार रुपये ) वृद्धाश्रमाला देणगी संस्थेचे संपर्कप्रमुखं पांडुरंग शालिक पवार यांच्या कडे देऊ केली.श्री. साहेबराव महाजन सरांनी सामाजिक कार्यास मदत केली.
या वेळी स्व.सौ.शोभाई निराधार वृद्धाश्रमचे अधक्ष- संजय पवार मुख्याध्यापक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा
उपाध्यक्ष- डॉ.सूर्यकांत पवार
सचिव-डॉ.संतोष पाटील शिव व्याख्याते गोराडखेडा
सदस्य-डॉ.निलेश पवार व डॉ.दिपक पवार यांनी श्री.साहेबराव महाजन सर यांचे मनापासून आभार मानले…