पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त तिसगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त तिसगाव येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.स्वस्तिक नेत्रालय व्हिजन सेंटर,सुशिल ऑप्टिकल तिसगाव शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तिसगाव एसटी स्टँडजवळील सुनिल मेडिकल शेजारी या शिबिराचे ठिकाण आहे.तरी तिसगाव पंचक्रोशीतील रुग्णांनी प्रथम नावनोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सकाळी अकरा वाजता तिसगाव येथील पाथर्डी रोडवरील आशिर्वाद मंगल कार्यालयात जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे यांच्या ७५ वी च्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सुनिल शिंगवी,आणि सुशिल ऑप्टिकल सेंटर,व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

























