पिंपळगाव हरेश्वर येथे हिंदू नव वर्ष प्रतिपदा स्वागत शोभायात्रा उत्साहात संपन्न

पिंपळगाव हरेश्वर येथे हिंदू नव वर्ष प्रतिपदा स्वागत शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली

स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने स्वातंर्त्र्याचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व समाजातील सर्व समाज एकत्र व्हावा सर्व जाती पंथ एकत्र व्हावे सर्व समाजातील थोर पूर्ण संत महंत यांची माहिती समाजाला व्हाव्ही सर्व समाजांमध्ये एकोपा निर्माण व्हावा या साठी छोटासा प्रयत्न म्हणून शोभा यात्रेचं नियोजन ठरले.या शोभायात्रेची तयारी एक महिना पहिले सर्व समाजातील सर्व समाज अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पंथातील मान्यवर यांची बैठक झाली त्यात एक समिती स्थापन करण्यात आली.त्या समिती द्वारे शोभा यात्रेचं नियोजन करण्यात आले.
प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्र्वर येथे सकाळी गावात हिंदू नवं वर्षा निमित्त गावातील सर्व मंदिरांवरील ध्वज लावण्यात आले त्या नंतर संध्याकाळी भारत मातेचं प्रतिमेचे पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे स.पो.नि.महेंद्र वाघमारे व गावातील प्रतिष्टीत व्यक्त्तींच्या यांच्या हस्ते करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली यात्रेत विविध संत, महंत, वीर पुरुष, यांच्या पालख्या सोबत जन समुदाय सहभागी झाला हिंदू संस्कृती चे असलेले नवीन वर्ष गावातील सर्व हिंदू समाज बांधव मिळून साजरा करण्यात यावा या साठी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.रॅली मध्ये भारत माता , स्वामी विवेकानंद, हरिहरेश्वर, गोविंद महाराज बाबा साहेब आंबेडकर, संत सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, शबरी माता, सरदार वल्लभभाई पटेल, संत सेना महाराज,भगवान विश्वकर्मा, प्रभू श्री राम चंद्र, कालिंका माता, वाल्मीली ऋषी, संत गाडगे महाराज, संत जगनाडे महाराज,भगवान महावीर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,शिव बाबा ओम शांती परिवार, संत गोरोबा कुंभार, छत्रपती शिवाजी महाराज,, अश्या अनेक संत महात्मा वीर पुरुष यांच्या प्रतिमा व आकषर्क सजवून शोभा यात्रेत काढण्यात आल्या. शोभा यात्रेच्या दोन दिवस अगोदर पूर्ण गावामध्ये भगवे ध्वज प्रत्येक घरावर्ती लावण्यात आले ज्या मार्गाने शोभायात्रा जाणार होती त्या मार्गावरती प्रत्येकाने आप आपल्या दारी व ठीक ठिकाणी चौका चौकात छान रांगोळी सडा टाकलेला दिसून आला वीर लहुजी मित्र मंडळ यांच्या तर्फे व बाबासाहेब आंबेडकर मित्र परिवार यांच्या तर्फे व ठीक ठिकाणी रॅलीत आलेल्या ग्रामस्थांसाठी शरबत व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण गावात ध्वज लावण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, बजरंग दलाचे कार्यकर्ते व जय श्री राम ग्रुप पिंपळगाव हरे या कार्यकर्त्यांनी केले.उत्सव समिती प्रमुख संतोष गोविंदा गोरे,सह प्रमुख राजेंद्र रघुनाथ बडगुजर सदश्य डॉ.शांतीलाल जी तेली,रवींद्र सुखदेव गीते,नाना भाऊ गोविंदा पाटील,पंडित रामदास तेली,विजय प्रकाश चौधरी,कोमलसिंग गोविंदसिंग देशमुख,ईश्वर रघुनाथ पाटील,परेश अशोक पाटील,विकास विठ्ठल लोहार,तालीप शेख कुतुबुद्दीन,योगेश शंकर हटकर,शामभाऊ कृष्णा महाजन,अल्लाउद्दीन तडवी,प्रितेश जैन,राजेंद्र विश्वनाथ महाजन,किरण वसंतराव बडगुजर,सुमनबाई सुभाष सावळे,अशोक हरी पाटील,अशी समिती तयार करण्यात आली…या समितीने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यस्वसी केला कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ सर्व समाज बांधव सर्व समाज पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन, पिंपळगाव परिसर पत्रकार बांधव यांचे समितीच्या वतीने आभार मानले..