विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव पथकाची अवैध मद्य तस्करी विरोधात कारवाई

विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव पथकाची अवैध मद्य तस्करी विरोधात कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सन्माननीय आयुक्त महोदय मा. श्री. कांतीलाल उमाप साहेब, संचालक अं. व दक्षता मा. श्रीमती उषा वर्मा मॅडम, तसेच विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग, नाशिक मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव मा. श्रीमती सिमा झावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, जि.जळगाव यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक ०८/०३/२०२२ रोजी रावेर तालुक्यातील खिर्डी या ठिकाणी छापा टाकुन देशी दारुची अवैधरित्या विक्री करतांना एकुण ०२ आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेले त्यात देशी दारुचे एकुण ४० बॉक्स असा एकूण रु. १,१७,२२०/- किमतीचा दारुबंदी असून गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीत इसम नाम १) कुलदिप भागवत जैस्वाल आणि २) जितेंद्र रमेश जैस्वाल यांचे तावे कब्जातून जप्त केला व त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करण्यात आलेली आहे. सदर अवैध मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे.

सदर कारवाई विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओ. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, श्री. राजेश नि. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, श्री. सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यावल तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक, मधुकर वाघ जवान नितीन पाटील, विठ्ठल हाटकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव सा. श्रीमती सिमा झावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओं. कपाटे हे करीत आहेत.

III