स्व.चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

स्व.चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या १०३व्या जयंती निमित्ताने राजळे महाविद्यालयात तीन दिवसीय स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व ज्ञानाधारीत समाज निर्मिती, शास्त्रज्ञ डॉ काशिनाथ देवधर यांचे ऑपरेशन सिंदूर व संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत, आणि ह.भ.प. लक्ष्मण महाराज भवार यांचे संत साहित्याचा सामाजिक संस्कार या विषयावर व्याख्यान झाले.स्व.दादापाटील राजळे यांच्या जयंतीदिनी स्व.चंद्रभागाबाई दादा पाटील राजळे सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने एकूण ५७ गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.या मध्ये सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल राजळे हे होते.या वेळी विक्रमराव राजळे, रामकिसन काकडे, सुभाषराव ताठे, बाबासाहेब किलबीले,आर.जे. महाजन,ह.भ.प. दतात्रय महाराज राजळे, अर्जुन चितळे, हे आवर्जून उपस्थित होते.प्रारंभी प्रास्ताविक डॉ राजधर टेमकर यांनी केले.त्यांनी दादा पाटील राजळे यांच्या कार्याचा जिवनपट उलगडून सांगितला.स्व. चंद्रभागाबाई राजळे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव राजळे आगामी काळात होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी कसे आत्मनिर्भर होऊन कशा प्रकारे शिक्षण घ्यावे या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली.ह्.भ.प. लक्ष्मण महाराज भवार यांनी सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेवटी पसायदानाने या सोहळ्याची सांगता झाली.उपस्थीत मान्यवरासाठी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.