माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सोनई येथे ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी फराळाचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाविकास आघाडी सरकार मधिल उबाठा शिवसेनेचे नेते आणि माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या वतीने सोनई येथे दि.३१ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी नेवासे तालुक्यातील तमाम जनतेला दिपावलीच्या सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. गडाख घराण्याची दरवर्षी मतदार संघातील सर्व सामान्य लोकांना दिपावली फराळाचे वाटप करण्याची जी परंपरा आहे.ती या वर्षी ही अखंडीतपणे सुरू ठेवण्यात आली आहे.सोनई तील गडाख मळ्याऐवजी जगदंबा देवी मंदिरातील प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.दि.३१ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील आणि नेवासा तालुक्यातील गडाख पाटील मित्र परीवारांनी या प्रिती भोजन सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील मित्र परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.नेवाशाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील परीवार यांनीही त्यांच्या गावी शिरसगाव येथे सोमवारी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते.अगदी त्याच पार्श्वभूमीवर पाच दिवसातच गडाख पाटील परीवारानेही या दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे.म्हणजे शंकरराव गडाख पाटील यांनी पुन्हा तालुक्यातील आपली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. हे या वरून दिसून येते. (ताजा कलम) पावसाळी वातावरण असल्याने गडाख मळ्याऐवजी जगदंबा देवी मंदिरातील प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे असे संयोजकांनी सांगितले आहे .

























