पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे

पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे

पाचोरा-
पाचोरा व भडगाव तालुक्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत येथील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पाचोरा व भडगावच्या माध्यमातून,आज पाचोरा भागाचे म.प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी बोलतांना सांगितले की उडीद पिक काढणी च्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेली आहे.तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे.त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले असून.
आम्ही भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून म.प्रांताधिकारी सो.पाचोरा यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे.त्यामध्ये पाचोरा तालुक्यातील १३०७४ व भडगाव तालुक्यातील ५१२६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असुन या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास सूचना द्याव्यात तसेच सदरील पिक विम्यासाठी महाराष्ट्र शासन, कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांचा शासन निर्णय
क्र.प्रपीवियो-२०२२/प्र. क्र.७२/११-अे दि.१ जुलै २०२१ नुसार (अ.क्र.१०.२)प्रतिकूल हवामान परिस्थिती,(अ.क्र.१०.४) स्थानिक आपत्ती व (अ.क्र.१०.५ )काढणी पश्चात झालेले नुकसानीची भरपाई याचा देखील आढावा घेऊन तात्काळ आपण आदेश निर्गमित करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ शासनास झालेल्या नुकसानीचे अहवाल सादर करणे बाबत कारवाई करावी.अशी विनंती केली आहे.असे अमोलभाऊ शिंदे यांनी बोलतांना सांगितले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील किसान मोर्चाचे पाचोरा तालुका अध्यक्ष विश्वास पाटील भडगाव तालुका अध्यक्ष यशवंत पाटील शहराध्यक्ष रमेश वाणी विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ माजी सभापती बन्सीलाल पाटील सरचिटणीस संजय पाटील गोविंद शेलार प्रदीप पाटील नंदू बापू सोमवंशी दीपक माने, महेश पाटील ललिता पाटील ज्योतीताई भामरे संगीताताई पाटील किरण काटकर विनोद महाजन प्रमोद सोमवंशी किरण पाटील पदमसिंह परदेशी शरद पाटील मुकेश पाटील राहुल गायकवाड प्रशांत सोनवणे रहीम बागवान विनोद शेजवळ राकेश कोळी गोकुळ दारकोंडे जगदीश पाटील रमेश श्यामनानी भैया ठाकूर विजय महाजन जीवन राजपूत आदि. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.