पी जे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे खासदार उमेश पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव

पी जे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे खासदार उमेश पाटील यांचा अभिनंदनाचा ठराव

पाचोरा येथे गेल्या तीन महिन्यापासून पी जे रेल्वे बचाव कृती समिती मार्फत सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे पाचोरा, वरखेडी, पिंपळगाव ,शेंदुर्णी, पहुर व जामनेर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन व जनतेच्या सह्या जमा करुन दिल्ली येथे शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री व रेल्वेचे अधिकारी यांची भेट घेऊन व चर्चा करुन दिल्ली येथे शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार उमेश दादा पाटील यांनी केले त्याचा परिणाम पी जे रुळ काढण्याचे काम थांबवले गेले व संसदेत खासदार उमेश पाटील यांनी पी जे रेल्वे लवकर सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी यानी रेल्वे ट्रॅक व रेल्वे स्टेशनच्या परिसराचा आढावा घेतला, पी जे बचाव कृती समिती पाचोरा येथे बैठक सुरू असताना खासदार उमेश दादा पाटील यांच्याशी मोबाईल द्वारे संवाद साधुन कृती समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडली व खासदार उमेश पाटील यांनी सांगितले की दि २४/३/२२ रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याबरोबर पी जे रेल्वे गाडी संदर्भात बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये सविस्तर पी जे गाडी सुरू करण्यासंदर्भात निर्णायक चर्चा होणार असल्याचे सांगितले त्यामुळे पी जे गाडी सुरु होण्याबाबतीत आशावाद निर्माण झाला असून संपूर्ण जिल्ह्याचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे आजच्या बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष खली दादा देशमुख कार्याध्यक्ष अँड अविनाश भालेराव खजिनदार पप्पू राजपूत सचिव सुनील शिंदे प्राध्यापक मनिष बाविस्कर भरत खंडेलवाल प्रा गणेश पाटील रणजीत पाटील सर संजय जडे विकास वाघ अनील आबा येवले अरूण पाटील संदीप मोराणकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते