नुकसान भरपाई पात्र विमाधारक शेतकऱ्यांसाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

नुकसान भरपाई पात्र विमाधारक शेतकऱ्यांसाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम सन 2020) मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणेसाठी घेतला आक्रमक पवित्रा
————
विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याबाबत कृषि विभागाची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर
—————-
जळगाव – शेतकऱ्याशी निगडीत असलेला अतिशय महत्त्वाचा प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2020 च्या अनुषंगाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेट घेऊन, विनंती करून देखील आजतागायत संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही हे अतिशय खेदजनक व निंदनीय आहे. दोनशे कोटींचा गल्ला (प्रीमियम) जमा करणाऱ्या विमा कंपनी कडून फक्त चार कोटींची नुकसान भरपाईवर देखील डल्ला मारणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याबाबत कृषि विभागाची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून २५ तारखेपर्यंत नुकसान भरपाई द्यावी अन्यथा गुन्हे दाखल न झाल्यास अखेर विमाधारक शेतकऱ्यांसाठी कृषि अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागेल. असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे पत्राद्वारे केल्याने जिल्हा प्रसाशनात खळबळ उडाली आहे.

*प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम सन 2020) मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणेसाठी घेतला आक्रमक पवित्रा*
जळगाव जिल्ह्यातील 1,62,861 शेतकऱ्यांनी कापूस,उडीद,मूग,सोयाबीन, मका, ज्वारी इ. पिकाचा 1,56,725, हे. क्षेत्रावरील विमा उतरविला होता. सदरील विमापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेली विमा रक्कम ही रू.28,82,38,805/- (अक्षरी रक्कम रु.28 कोटी 82 लाख 38 हजार 805) एवढी आहे. सदरील योजनेचा शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या हिश्श्याची विमा हप्ता भरलेली रक्कम रु.73,92,02,535/- (अक्षरी रक्कम रु.73 कोटी 92 लाख 2 हजार 535) व राज्य सरकारच्या हिश्याची विमा हप्ता भरलेली रक्कम रु.90,60,75,535/- (अक्षरी रक्कम रु.90 कोटी 60 लाख 75 हजार 535) एवढी असून एकूण विमा कंपनीस रक्कम रु.193,35,16,875/-(अक्षरी रक्कम रु.193 कोटी 35 लाख 16 हजार 875) इतकी आहे. सदरील कालावधीतील विमा हप्ता शेतकरी, केंद्र व राज्य सरकारने विमा कंपनीस देऊन देखील सदरील कंपनी आजतागायत जिल्ह्यातील 10150 शेतकऱ्यांना मंजूर झालेली नुकसान भरपाई ची रक्कम रु.4,70,97,489/- (अक्षरी रक्कम रु.4 कोटी 70 लाख 97 हजार 489) इतकी म्हणजेच एकूण मिळालेल्या विमा हप्त्याच्या निव्वळ 2.43 टक्के परतफेड शेतकऱ्यांना केलेली नसून संबंधित विमा कंपनी ही रक्कम देण्यास देखील टाळाटाळ करीत आहे. याबाबत मी आपली प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विमा कंपनीवर आपण कृषि विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने गुन्हा दाखल करण्याबाबत यापूर्वी देखील निवेदनाद्वारे विनंती केली होती. परंतु आपण याबाबत कुठलीही कारवाई केली नसल्याचे मला अवगत झाले आहे. मी आपणास पुनश्च या पत्राद्वारे विनंती करतो की, जिल्ह्यातील 10,150 शेतकऱ्यांची थकित असलेले विमा रक्कम तात्काळ मिळवण्याकरिता आपण संबंधित विमा कंपनीस सूचना द्याव्यात व सदरील रक्कम दि.23/02/2022 पर्यंत 12% विलंब शुल्कासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाबत कळवावे. या कालावधीत संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा न केल्यास *आपण जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव या नात्याने आपण दि.25/02/2022 रोजी सायं.5.00 वाजे पर्यंत संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा या कालावधीत आपण गुन्हा दाखल न केल्यास मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसह दि.25/02/2022 रोजी सायं.6.00 वाजे पासून गुन्हा दाखल होईपर्यंत पात्र विमाधारक शेतकऱ्यांसह आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल* असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात दिला आहे.