भा.ज.पा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक कृष्णापुरी येथील पाचोरा शहर भा.ज.पा सरचिटणीस जगदीश पाटील यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे स्वागत

भा.ज.पा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक कृष्णापुरी येथील भा.ज.पा सरचिटणीस पाचोरा शहर श्री जगदीश पिराजी पाटील यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे स्वागत

 

 

दिनांक 5 मार्च मंगळवारी जळगाव येथे युवा संमेलन दौऱ्या निमित्त भारत देशाचे गृहमंत्री माननीय श्री अमितजी शहा यांचा विमानतळावर जिल्ह्याभरातून पक्षाच्या विविध पदाधिकारी यांना स्वागत व सत्कार करण्याची संधी मिळाली यामध्ये पाचोरा शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे खंदे समर्थक कृष्णापुरी येथील रहिवासी भाजपा सरचिटणीस पाचोरा शहर श्री जगदीश पिराजी पाटील यांची देखील पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली व त्यांनी केंद्रीय गृहमंत्री मा अमित शहा यांचा जळगाव विमानतळ येथे सत्कार करून जळगाव नगरीत स्वागत केले ही पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागासाठी एक अभिमानाची बाब असून पक्ष संघटनेमध्ये हिरारीने व चिकाटीने संघटनात्मक कार्य करणाऱ्या जगदीश पाटील यांचे पाचोरा शहरातून कौतुक केले जात आहे तसेच एखाद्या पक्षाशी एकनिष्ठ राहुन मनात कुठलाही प्रकारचा स्वार्थ व कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निरंतर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांला नक्कीच योग्य ठिकाणी संधी मिळते याचे हे ज्वलंत उदाहरण समजले जाईल यावेळी जगदीश पाटील यांच्याशी संवाद साधला असता जगदीश पाटील हे एका पतसंस्था चे पिगमी एजंट म्हणून काम करत असून त्या माध्यमातून त्यांचा लोकांशी मोठा जनसंपर्क आहे व ते नेहमी विविध सामाजिक उपक्रमात देखील अग्रेसर असतात अशा या मितभाषी जगदीश पाटील यांची पक्षाप्रति असणारी एकनिष्ठता ही नक्कीच इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे