ना.पंकजा मुंडे यांना अश्शिल मेसेज पाठवणाऱ्या परळीतील अमोल काळेच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

ना.पंकजा मुंडे यांना अश्शिल मेसेज पाठवणाऱ्या परळीतील अमोल काळेच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना अश्शिल मेसेज पाठवणाऱ्या परळीतील अमोल काळेच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन पुण्यातील भोसरी येथुन त्याला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे हा मुळचा बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.परंतू शिक्षणासाठी तो पुण्यातील भोसरी परिसरातील एका ठिकाणी वास्तव्य करून रहात होता. नोडल सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल काळे याने ना.मुंडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवून अनेक वेळा मोबाईल वर अश्शिल मेसेज पाठवून ताईंना त्रास दिला होता. ना.मुंडे यांनी ही माहिती भारतीय जनता पक्षाचे राज्य स्तरीय सोशल मीडियाचे प्रमुख समन्वयक प्रकाश गाडे यांना दिली होती.त्यांनी ही माहिती मुंबई येथील कार्यालयातील निखिल भामरे यांना सांगून पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी सांगितले होते.त्या प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्या तक्रारीमध्ये अज्ञात व्यक्ती ना.पंकजाताई मुंडे यांना अश्शिल मेसेज पाठवून त्रास देत असल्याचे सांगून सदर मोबाईल नंबर नमुद करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबर चे सीडीआर,लोकेशन डिटेल्स काढून तपासणी केली असता तो मोबाईल नंबर पुण्यातील भोसरी परिसरातील टाॅवरच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आले. मग स्थानिक पुणे पोलिसांच्या मदतीने नोडल सायबर पोलिसांनी भोसरी परिसरातून अमोल काळे यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानें त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतू पोलीसांनी चौदावे रत्न दाखवताच तो पोपटासारखा मिटूमिटू बोलू लागला. त्याने अश्शिल मेसेज पाठवून ताईंना त्रास दिल्याचा कबुली जबाब दिला आहे.तो मुळचा बीड जिल्ह्यातील परळीतील असुन पुण्यातील भोसरी परिसरात शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाईल पोलीसांनी जप्त केला असुन तो न्याय वैद्यक प्रयोगशाळेत सखोल तपासणी साठी पाठविण्यात आला आहे.त्याने पाठवलेले मोबाईल मधील काही मेसेज डीलीट केले असल्याचे उघडकीस आले आहे.सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई येथे पाठविले होते.अमोल काळे (वय वर्षे २५) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९, आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील विविध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालया मार्फत त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काळे यांनी अजून ही कोणा कोणाला हे असले अश्शिल मेसेज पाठवून काळे धंदे करून त्रास दिला होता याची पोलिस स्टेशनमध्ये कसुन चौकशी करण्यात आली आहे. मोबाईल वर अश्शिल मेसेज पाठवून त्रास देणे, शिवीगाळ करणे, व्हाट्सअप वर उघडे नागडे फोटो टाकून वातावरण दुषीत करणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टींना सायबर गुन्हा अन्वेषण विभाग सोडत नाही हे मोबाईल धारकांनी आवर्जून लक्षात घेऊन आपल्या हातातील मोबाईलचा जपून वापर करावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.