खासदार उन्मेशदादा यांच्या प्रयत्नातून लोहारी ता. पाचोरा येथील तीनशे एकरावरील पिके वाचली

खासदार उन्मेशदादा यांच्या प्रयत्नातून लोहारी ता. पाचोरा येथील तीनशे एकरावरील पिके वाचली

वेळीच केबल बदलल्याने ट्रान्सफॉर्मरवरील विज पुरवठा सुरळीत: शेतकऱ्यांनी मानले खासदारांचे आभार
——————–
लोहारी ता. पाचोरा – येथील हायस्कूल डीपी सातत्याने केबल जळत असल्याने गेल्या पंधरवाड्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता. खासदार उन्मेशदादा पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे लोहारी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष शरद पाटील यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केबलची जोडणी करण्यासंदर्भात विनंती केली होती. खासदार उन्मेशदादा यांनी तातडीने विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना फोन करून दोन दिवसाच्या आत केबल बदलून संबंधित हायस्कूल डीपी वरील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज हायस्कूल डीपीवर तातडीने केबल बदलून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने या परिसरातील 56 शेतकऱ्यांचे सुमारे तीनशे एकरावरील पिके वाचली आहेत.
*वेळीच केबल बदलल्याने ट्रान्सफॉर्मरवरील विज पुरवठा सुरळीत*: *शेतकऱ्यांनी मानले खासदारांचे आभार*
खासदार उन्मेशदादा पाटील दिल्ली येथील अधिवेशनात व्यस्त असतांनादेखील तातडीने आमच्या तक्रारीची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खंबीर पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य भाजपा तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, शिवाजी पाटील, संजय कर्नल,किशोर पाटील,श्यामभाऊ वायरमन पाटील, नवल पाटील, राजेंद्र कुमावत, हिराजी पाटील, मंगेश वायरमन, किशोर कुमावत सर्व संबंधित शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर आभार मानले आहेत.