Home महाराष्ट्र सोयगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार चंद्रकांत दौड यांचा सेवा गौरव सोहळा...

सोयगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार चंद्रकांत दौड यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

सोयगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार चंद्रकांत दौड यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

 

 

 

 

सोयगाव (तालुका विशेष प्रतिनिधी – दत्तात्रय काटोले दि. ०७ जानेवारी

सोयगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार चंद्रकांत पंडितराव दौड हे दीर्घ सेवेनंतर दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवागौरवानिमित्त सोयगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ३० डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन परिसरात सहपत्नीक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर होते. पोलीस खात्यात तब्बल १७ वर्षे सेवा बजावलेल्या पोलीस हवालदार चंद्रकांत दौड यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. सोयगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

 

यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर म्हणाले, “चंद्रकांत दौड हे अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी होते. त्यांच्या कार्यातून आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा मिळाली. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सोयगाव पोलीस स्टेशन परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.”

 

याप्रसंगी पोलीस कर्मचारी संदीप सुसर, सादीक तडवी, गजानन दांडगे, राजू सोनवणे, नारायण खोडे, अजय कोळी, संजय बाम्हदे यांनी चंद्रकांत दौड यांच्या सेवाकालातील अनुभव सांगत मनोगत व्यक्त केले.

 

कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर यांच्यासह संदीप सुसर, गजानन दांडगे, राजू सोनवणे, सादीक तडवी, अजय कोळी, पवन तायडे, श्रीकांत तळेगाव, राजू बरडे, नारायण खोडे, शांताराम सपकाळ, होमगार्ड योगेश बोखारे, मिर्झा सर, संजय बाम्हदे, संजय सिंगल, प्रियंका बोडखे, बापू लव्हाळे, प्रशांत जाधव आदी पोलीस कर्मचारी, मित्रपरिवार तसेच दौड कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Don`t copy text!