जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ,कृष्णापुरी तर्फे गुंतवणूक तज्ञ रोहीत मिश्रा यांचे व्याख्यान संपन्न

जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ,कृष्णापुरी तर्फे गुंतवणूक तज्ञ रोहीत मिश्रा यांचे व्याख्यान संपन्न

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती चे औचित्य साधून दिनांक २९ जुन बुधवार रोजी गुंतवणूक तज्ञ रोहीत मिश्रा यांचे व्याख्यान जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ, कृष्णापुरी तर्फे आयोजित करण्यात आले होते.जयहिंद ग्रंथालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यात रोहीत मिश्रा यांनी आर्थिक नियोजन, भविष्यातील महागाईचा विचार करता असणारी गुंतवणूक, शासकीय विमा योजनेचा फायदा,खर्चाचे नियोजन, मुच्युअल फंड मधील गुंतवणूक असे अनेक मुद्दे घेऊन सोप्या व सविस्तर पणे मार्गदर्शन केले.मुख्यत: वयाच्या ६० वर्षांनंतरही आपण केलेल्या भुतकाळातील गुंतवणुकीतुन आपलं उत्पन्न चालू असलं पाहिजे तसेच या वयात गुंतवणूकीचा आर्थिक फायदा कशाप्रकारे होतो याची ही माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद महाजन यांनी केले,प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी मांडले तर आभार नितीन पाटील यांनी मानले.कार्यक्रमात शरद गिते, विनोद पाटील, प्रमोद बारी, संदीप मराठे, संतोष महाजन, अश्विन महाजन, प्रशांत सोनार,मोहनिश भावसार,गोपाल सुर्यवंशी, कन्हैया देवरे, गणेश पाटील आदी अनेक जण उपस्थित होते.कार्यक्रमासाठी भुषण पाटील, मयुर शेलार, सुनील महाजन,समीर निंबोळे, अण्णा पाटील, गणेश पाटील,सागर सुर्यवंशी, अविनाश पिंगळे या जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.