अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे सर्व सामान्य ग्राहक व ग्राहक चळवळ कार्यकर्त्यांना राष्ट्रीय ग्राहक दिन सदंदर्भात आव्हान
राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत 24 डिसेंबर 2021रोजी शासनाने ग्राहकास न्याय हक्क समजलेच पाहिजे असे ब्रीद वाक्य ठेवत उत्सवात साजरे केले जावा व त्यासाठी जनजागृती पर व्याख्याने ,पथनाट्य ,शाळा कॉलेजेस मधून ग्राहक हक्क ,न्याय कर्तव्य व ग्राहक कायदा सर्व सामान्य ग्राहकास मूलभूत माहिती मिळालीच पाहिजे व त्यासाठी मोठी जनजागृती कोरोना विषयीचे सर्व शासकीय नियमांचे पालन करीत हा महत्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी सरवोतोपरी सहकार्य करण्याचे व त्या अनुषंगाने जिल्हा स्थरावर जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ग्राहक चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हास्तरीय अल्पबचत भुवन येथे 10 वाजता व विविध तालुक्यातील सर्व आयोजित जनजागृती
कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात पाचोरा ,भडगांव चाळीसगाव , भुसावळ ,धरणगाव ,अमळनेर , रावेर ,बोदवड ,आदी सर्वच तालुक्या मधील आयोजित कार्यक्रमात ग्राहक व ग्राहक चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे व ग्राहक कायदा व न्याय हक्क ,कर्तव्ये जाणून घ्यावे व काही तक्रारी किंवा कुठेही ग्राहक फसवणूक झाली असेल तर त्या संबंधी चे निवेदने अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पाचोरा येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटक श्री शरद गीते , परिवहन समिती प्रमुख श्री सुरेश तांबे ,श्री लक्षुमान सूर्यवंशी प्रभोडण समिती ,श्री गिरीश दिसणे अंनव औषध समिती प्रमुख ,डॉ एन आर पाटील ,कृषी समिती ,सौ .अरुना उडवांत पाचोरा व चाळीसगाव येथे तालुकाध्यक्ष श्री रमेश सोनावणे ,भडगांव येथील श्री सुरेश रोकडे सर,निलेश बडगुजार,अमळनेर येथील तालुका अध्यक्षा सौ . भारती अग्रवाल व माजी अध्यक्ष व जिल्हा सहसंघतक मक्सुद जी बोहरी,भुसावळ येथे तालुका अध्यक्ष सौ. कल्पना टेंबानी ,बोडवड येथे श्री संजय जी अग्रवाल ,रावेर येथे तालुकाध्यक्ष श्री adv धनराज पाटील ,फैजपूर येथे श्री मंत्री व यावल येथे श्री दादा वणी ,वरणगाव येथे तालुका सहसचिव व वरणगाव अध्यक्षा सौ.रेखाताई देशमुख ,जिल्हा कार्यकारिणी महिला प्रतिनिधी सौ सविता माळी ,जिल्हा स्थरावर जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख ,संघटक श्री जगन्नाथ तळेले ,सहसांघतक श्री मकसुड बोहरी,उपाध्यक्ष दिनेश तायडे व विनायक महाजन तालुका अध्यक्ष धरणगाव ,सौ.सविता नंदांवल जळगाव महिला प्रतिनिधी ,जिल्हा सचिव श्री adv सुभाष तायडे यांचेकडे सबळ पुराव्यानिशी म्हणजे ओरिजनल बिल ,जाहिरात ,अथवा अन्य फसवणूक ऑनलाईन संबंधी ची कागद पत्रंसह तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन सर्व सामान्य ग्राहकास करण्यात येत आहे त्यांचे तक्रारीची योग्य दखल व मार्गदर्शन वरील सर्व अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ते व पदाधिकारी करतील असेही निवेदनात जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांनी केले आहे.