चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. १५ जानेवारी व १६ जानेवारी २०२५ रोजी ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आलेले असून या स्नेहसंमेलनात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा, पाककला इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मा.राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी अहिराणी लोकसाहित्य अभ्यासक व धुळे येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांच्या गझल सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मधुकर साळवे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे चोपडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. कविता सुर्वे यांच्या हस्ते पाककला स्पर्धेचे उदघाटन होणार आहे तसेच चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद अशोक पाटील यांच्या हस्ते ‘आनंद मेळाव्याचे’ उदघाटन होणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलन उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती. आशाताई विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. १६ जानेवारी २०२५ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात चोपडा येथील वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मा. प्रथमेश हाडपे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. तरी या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा तसेच ओळ्खपत्रासह गणवेशात उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी,

उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल,

उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस. ए. वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी. पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री.पी. एस. पाडवी आणि कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री. एन. बी. शिरसाठ तसेच वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. पी. के. लभाणे यांनी केले आहे.