पाचोर्‍यातील ५१ हजार शेतकऱ्यांना अनुदानासह शहर व ग्रामीण भागातील नुकसानीच्या पंचनाम्याला मंत्र्यांचा हिरवा कंदील

पाचोर्‍यातील ५१ हजार शेतकऱ्यांना अनुदानासह शहर व ग्रामीण भागातील नुकसानीच्या पंचनाम्याला मंत्र्यांचा हिरवा कंदील

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे जवळपास ५१ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असुन हे अनुदान दिवाळी च्या आत मिळणार आहे. शहर व ग्रामीण भागातील घरातील नुकसानीचे पंचनामे केले जातील या पाचोरा काॅग्रेस च्या मागणीला मंत्र्याने दिला हीरवा कंदील दिला आहे.

बुरहानपुर येथील प्रचार सभेसाठी विशेष विमानाने आपत्ति व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार हे जळगावी आले असता पाचोरा काॅग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, ओबीसी सेल चे समाधान ठाकरे यांनी ना. वडेट्टीवार यांना निवेदन देवुन चर्चा केली यात पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे जवळपास सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले यात फळझाडे देखील आहेत मात्र शासन दरबारी निंबु, मोसंबी यांचे नुकसान झाले असतांना पंचनामे केले नाहीत ते करण्यात यावे तसेत पाचोरा शहरातील अनेक घरांमध्ये व दुकाने, गॅरेज, शोरूम मध्ये पाणी घुसून फार मोठे नुकसान झाले तरी देखील पंचनामे केली नाहीत ते पंचनामे त्वरित करावे. शासनाने कृषी आणि महसुल यांनी एकत्र येऊन जवळपास ५४८०६ हेक्टर बाधीत क्षेत्राचे ५१हजार १९४ शेतकर्‍यांचे पंचनामा करुन अंतीम अहवाल शासनाकडे दिला आहे त्याचे अनुदान दिवाळी पुर्वी द्यावे अशी निवेदनात मागणी केली हे प्रश्न तात्काळ मार्गी लागतील असे आश्वासन ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी आ. शिरीष चौधरी, नुतन जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, माजी खा. उल्हास पाटील, जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, ज्ञानेश्वर कोळी, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, भुषण पवार, आशुतोष पवार आदी उपस्थित होते.