पाचोरा शहरात रस्त्यांवर जनावरे ‘मोकाटʼ

पाचोरा शहरात रस्त्यांवर जनावरे ‘मोकाट

पाचोरा ( प्रतिनिधी ) येथील शहरामध्ये हायवेवरती भर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या घोडख्या मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. पाचोऱ्यात नगरपालिका तर्फे मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगरपालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. पाचोरा शहरातील भारत डेअरी स्टॉप रिलायन्स पेट्रोल पंप भडगाव रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आठवडे बाजार अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे.भारत डेअरी स्टॉप जारगाव चोफुली हा मुबई ते नागपूर जाण्यासाठी हा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने जनावराची वर्दळ असते; मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते.भाजी मंडई येथे भाजीबाजार भरतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी येथे जनावरांचा घोडका उभा असतो. याचाही नागरिकांना अडथळा निर्माण होत असून त्याचा नागरिकांनाही त्रास होत आहे.

ठिकठिकाणी कचऱ्यामुळेही समस्या वाढली

शहरा शहरात कचरा टाकण्यासाठी नगरपालिकेने ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवल्या नाहीत. या मुळे रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्याप सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेल्या या कचऱ्यामध्ये अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येत आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.