भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाने घेतली दखल

भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाने घेतली दखल
———————————————————
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उमेदवारांना जात पडताळणी चे टोकन/पोहच जोडण्याची मुभा

पाचोरा-
ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१ साठी गावा-गावांतून उमेदवारीसाठी इच्छुकांची कागदपत्रे जमवा-जमव करून नामनिर्देशन भरण्यासाठी तारांबळ होत असतांना, मा.निवडणूक आयोगाकडून आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्याकरिता नामनिर्देशनापत्रा सोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणांत नाराजी बघावयास मिळाली होती.कारण सदर निवडणूक ही ग्रामीण भागातील असल्याने जात वैधता प्रमाणपत्र सर्वच उमेदवारांकडे असतीलच असे नाही.त्यामुळे आरक्षित जागेसाठी लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने ह्या निवडणुकी पासून वंचित रहावे लागले असते.तसेच काही आरक्षित जागा यामुळे रिक्त देखील राहू शकल्या असत्या या सर्व समस्यांबाबत काही इच्छुक उमेदवारांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना माहिती दिली असता,त्यांनी तात्काळ म.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क करून याबाबतीत सविस्तर माहिती दिली
तसेच त्या अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोग मुंबई व म.जिल्हाधिकारी जळगाव यांना दि.०३ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्र पाठवुन आरक्षित जागेसाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जात पडताळवी प्रमाणपत्र अथवा सदर प्रस्ताव जात पडताळणी कार्यलयात सादर केल्याची पोहच नामनिर्देशना सोबत ग्राह्य धरून इच्छुक उमेदवारास निवडणूकीत भाग घेण्याची संधी द्यावी व दि.०६ नोव्हेंबर २०२१ सोमवार ही शेवटची दिनांक असल्याने बाहेरगावी जाऊन पोहच मिळवण्यात त्यांची तारांबळ होईल त्यासाठी त्यांना वेळ देखील वाढवून मिळावी अश्या आशयाचे विनंती पत्र अमोल शिंदे यांनी दिल्या नंतर आज दि.०६ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने तसा आदेश काढून जात प्रमाणपत्रा सोबत जात पडताळणी कार्यालयाची पोहच अथवा प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा सादर करण्याची मुभा देऊन नामनिर्देशन सादर करण्यासाठी दु.३:०० ऐवजी सायं.०५:००पर्यंत वेळ वाढवली असून टोकन/पोहच जमा करण्यास उद्या दि.०७ नोव्हेंबर रोजी दु.१२:०० पर्यंत वेळ वाढवून देण्यात आल्याचे सदर आदेश्यात म्हटले आहे.यामुळे आता निवडणुक लढू इच्छिणाऱ्या सर्वच उमेदवारांना ह्या निवडणुकी सहभाग घेता येणार असल्याने इच्छुकांनी अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.