पाचोरा येथील डॉक्टर असोसिएशनची बैठक होऊन नवीन कार्यकारणी मध्ये तरुणांना दिली संधी

पाचोरा येथील डॉक्टर असोसिएशनची बैठक होऊन नवीन कार्यकारणी मध्ये तरुणांना दिली संधी

पाचोरा येथील डॉक्टर्स असोसिएशन संघटनेची गेल्या तीस वर्षांपूर्वी स्थापना झालेली असून,या संघटनेने आजपर्यंत एक डा्ँक्टर म्हणून स्वतःचे कर्तव्य बजावतानाच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणे, संघटनेमार्फत चांगले समाजोपयोगी काम करणे,गरजू लोकांना मदत करणे असे अनेक समाजहितासाठी चांगले निर्णय घेऊन संघटना वाढीसाठी कामे केली आहेत
या संघटनेची दरवर्षी बैठक होऊन नवीन अध्यक्ष निवडला जातो यामध्ये नेत्रृत्वक्षम, होतकरू सदस्यांना संधी दिली जाते,
डॉक्टर म्हणजे देवदूत: कोरोना काळात कोरोना पेशंटची काळजी घेऊन आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पेशंटला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते,पाचोरा शहरातील डॉक्टरांची टीम म्हणजे केव्हाही अर्ध्या रात्री कुणाला काही त्रास होत असल्यास मदतीला धावून आलेले आहेत,आणि यापुढेही येतील
यावर्षी नवीन वर्षाची डॉक्टर्स असोसिएशन कार्यकारणी बैठक नुकतीच स्वामी लॉन्स येथे घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ डॉक्टर व माजी चेअरमन डॉ. अनिल झवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यात खालीलप्रमाणे कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे
डॉ. श्री. दिनेश राजाराम सोनार यांची नुतन अध्यक्षपदी तर डॉ. श्री. सुनील पाटील यांची चेअरमन म्हणून तसेच डॉ. श्री. अतुल पाटील यांची उपाध्यक्षपदी तर डॉ. श्री नंदकिशोर पिंगळे यांची सचिवपदी आणि डॉ श्री जीवन पाटील यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ.श्री भरत लाला पाटील, डॉ.श्री नरेश गवंदे डॉ. श्री अजयसिंग परदेशी,डॉ. श्री वीरेंद्र पाटील, डॉ. श्री जाकीर देशमुख, डॉ.श्री आलम देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ श्री अमित साळुंखे, डॉ.श्री राहुल काटकर,डॉ. श्री राहुल झेरवाल, डॉ. श्री पवन पाटील डॉ. श्री आनंद जैन, डॉ. श्री राजेंद्र चौधरी, डॉ.श्री मुकेश तेली, डॉक्टर श्री हर्षल देव, डॉ श्री कुणाल पाटील,डॉ. श्री संजय जाधव, डॉ. श्री विजय जाधव डॉ.श्री सिद्धांत तेली, डॉ श्री प्रवीण माळी, डॉ,श्री दिपक चौधरी, डॉ. श्री राहुल पाटील, डॉ.श्री स्वप्निल पाटील, डॉ.श्री प्रविण देशमुख, डॉ श्री अल्ताफ खान, डॉ.श्री विशाल पाटील, डॉ प्रशांत सांगडे,डॉ.श्री योगेश इंगळे आणि इतर बरेच मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते,यावेळी नुतन अध्यक्ष डॉ. श्री दिनेश सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून, आरोग्य क्षेत्रातील विविध शिबिरे भरवणे, डॉक्टरांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असून आपण जीवनदान देणारी व्यक्ती आहे, आपण त्याचा त्यांना फायदा करून देणे, तसेच गैरसमजुतीमुळे नातेवाईकांकडुन डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता त्यांना कायदेशीर संरक्षण आणि योग्य ते मार्गदर्शन करून डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवणे याव्यतिरिक्त अनेक समाजपयोगी कार्य करून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. यावेळी पाचोरा शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर्स उपस्थित होते.