Home पाचोरा श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) – शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील संघटन बळकटीकरणासाठी विभागीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या दौऱ्यादरम्यान कामगारांचे विविध प्रश्न, संघटन विस्तार तसेच आगामी लढ्यांची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. संघटनेचे पदाधिकारी कामगारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, त्या सोडवण्यासाठी पुढील कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
या दौऱ्यात प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, प्रदेश संघटक श्री. नानासाहेब बच्छाव, सफाई कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री. संतोष मकवाना तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत.
📅 दि. ५ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मंगलम हॉल येथे कार्यक्रम होणार असून, त्यानंतर धुळे येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत जेष्ठ नागरिक भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबार येथे मुक्काम असेल.
📅 दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नंदुरबार येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हॉटेल शुगर अँड स्पाइस येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर नाशिक येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार असून, शिर्डी येथे सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या दौऱ्यास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटन बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
👉 “आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे”
👉 “संघटन बळकट करा – कामगारांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहूया”
👉 “एकत्र या – संघटित व्हा – हक्कांसाठी लढा!”
— प्रसिद्धी विभाग
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, उत्तर महाराष्ट्र

Don`t copy text!