पाचोरा येथे श्री राष्ट्रिय राजपुत करणी सेनेने राष्ट्रिय अध्यक्ष सुकदेव सिंह गोगामेडी यांना वाहिली श्रद्धांजली
दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास महाराणा प्रतापसिंह चौक पाचोरा येथे. श्री राष्ट्रिय राजपुत करणी सेना. राष्ट्रिय अध्यक्ष सुकदेव सिंह गोगामेडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांचे जीवनकार्यावर माहिती देऊन ही पोकळी न भरून निघण्यासारखी असल्याचे सांगत घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून अशा समाजकंठकांचे कधीही भले होणार नाही असे यावेळी बोलण्यात आले, यावेळी सकल राजपुत समाज बांधव, श्री राष्ट्रिय राजपुत करणी सेना युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष गिरीष भाऊ परदेशी श्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिंह राजपूत , क्षत्रिय गृप चे पप्पुदादा राजपुत श्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष पाचोरा महेंद्रसिंग राजपूत जारगाव सरपंच सुनील पाटील, वेरुळी गावाचे उपसरपंच अनिल राजपुत, प्रदीप पाटील अरुण पाटील . बाबजी ठाकरे राजपुत, विजय पाटील . दादु पाटील विलास राजपुत, संतोष सर समवंशी . राजु परदेशी गोराडखेडा. श्री. राष्ट्रीय राजपूत करणी सेना भडगांव तालुका उपाध्यक्ष सुनील राजपुत , किरण राजपूत कुरंगी गट युवा सेना तालुका समन्वय गणेश देशमुख अध्यक्ष पाचोरा शहर व तालुका समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,