Home पाचोरा सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल...

सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

सोशल मीडियावरील बुलंद आवाजाला मोठी जबाबदारी; किशोर रायसाकडा यांची जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

 

 

पाचोरा, : समाजातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडत जनतेच्या समस्या प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचविणारे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकजागृतीचे प्रभावी कार्य करणारे किशोर रामदास रायसाकडा यांची धाडस सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायसाकडा यांच्या कार्याला नवी ओळख आणि मोठी जबाबदारी प्राप्त झाली आहे.

धाडस सामाजिक संघटनेचे मराठवाडा विभागीय सचिव बाळासाहेब माने यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. रायसाकडा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जनहिताच्या प्रश्नांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर जळगाव जिल्ह्याच्या सोशल मीडिया प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

धाडस सामाजिक संघटना राज्यभर सामाजिक न्याय, जनजागृती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद (दादा) कोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबविण्यात येत असून सोशल मीडिया हे संघटनेच्या कार्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. जळगाव जिल्ह्यात संघटनेची विचारधारा, सामाजिक उपक्रम आणि जनहिताचे प्रश्न अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम आता किशोर रायसाकडा यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

नियुक्तीनंतर बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात प्रभावी माध्यम असून समाजातील प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. किशोर रायसाकडा यांचा अभ्यासू दृष्टिकोन, सामाजिक प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे पाचोरा आणि जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रायसाकडा यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक गतिमान करून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार रायसाकडा यांनी व्यक्त केला आहे.

जनतेचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून बुलंद करणाऱ्या किशोर रायसाकडा यांच्या या नियुक्तीकडे जळगाव जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

या अगोदरही किशोर रायसाकडा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष पद भुषविले आहे त्यांनी विभागावर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत त्यामुळेच पत्रकार किशोर रायसाकडा यांना मुंबई, पुणे,ठाणे, शिर्डी येथे बहुसंख्य राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असनारे रायसाकडा यांना राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष ह्या जबाबदारीचे पद त्यांच्याकडे आहे.

मागील किशोर रायसाकडा (कोळी) यांच्या कडे पाचोरा कोळी समाजाचे तालुका अध्यक्ष हे पद देखील त्यांनी भुषविले आहे.

Don`t copy text!