पाचोऱ्यात आर्ट ऑफ लिविंग हॅपिनेस प्रोग्रामचा पाचवा आणि समारोपाचा दिवस अत्यंत आनंददायी, ज्ञानमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला
आदरणीय चिराग दादांनी आपल्या मधुर, सहज आणि दिव्य वाणीतून मनाचा स्वभाव, ध्यानाचे महत्त्व आणि आर्ट ऑफ लिविंगच्या विविध कोर्सेसबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
🌿 आजचे काही अमूल्य संदेश…
🔹 “शरीर का स्वभाव है श्रम करना, और मन का स्वभाव है विश्राम करना!”
🔹 मनाला विरोध करून किंवा जबरदस्तीने नियंत्रित करता येत नाही. मनाला शांत करण्यासाठी श्वासाची मदत घ्यावी लागते.
🔹 ध्यान म्हणजे काहीतरी करणे नाही; जे घडत आहे ते घडू देणे, विचारांना येऊ देणे आणि जाऊ देणे – हीच खरी ध्यानाची अवस्था आहे.
🔹 सुदर्शन क्रियेनंतर दररोज किमान १० मिनिटे ध्यान केल्यास मन अधिक स्थिर, प्रसन्न आणि ऊर्जावान राहते.
🔹 जीवनात अधिक गहन अनुभवासाठी सहज समाधी कोर्स आणि ऍडव्हान्स कोर्स अवश्य करावेत.
🔹 ज्या व्यक्तीमुळे आपल्याला हा कोर्स करण्याची संधी मिळाली, त्या व्यक्तीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. 🙏
🔹 दुसऱ्यांची मनापासून प्रशंसा करणे हे दिव्यतेचे लक्षण आहे. 🌹
या पाच दिवसांच्या प्रवासात आनंद, शांती, उत्साह, प्रेम आणि आत्मविश्वासाचा अमूल्य ठेवा मिळाला. आता या ज्ञानाला केवळ ऐकून न घेता ते आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. 🌼
“हसत राहूया, आनंदी राहूया आणि हा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवूया!” 😊✨
हॅपिनेस कोर्स मध्ये सहभागी सर्व बंधू भगिनींचे मनपूर्वक धन्यवाद 🙏
विशेष आभार…🙏🙏
१) आदरणीय श्री चिराग पाटील .
इंटरनॅशनल टीचर & लाईफस्टाईल कोच
आर्ट ऑफ लिविंग.
२) सन्माननीय श्री रमेशजी मोर
संस्थापक शक्ती धाम,
भडगाव रोड पाचोरा.
३) आर्ट ऑफ लिविंग पाचोरा सर्व स्वयंसेवक.
४) शिबिरासाठी हातभार लावणारे सर्व ज्ञात -अज्ञात हात.
🙏 जय गुरुदेव 🙏























